शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा प्रश्न चार दिवसात सोडवणार :  नितीन करमळकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 21:21 IST

विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू केले जाईल असे आश्वासन सातत्याने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देअनुदान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संशोधक विद्यार्थी अडचणीत

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी पीएच.डी, एमफिल करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन अचानक बंद करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा ९ अधिसभा सदस्यांनी दिला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी सोमवारी सकाळी कुलगुरू कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यावेळी येत्या ४ दिवसात विद्यावेतनाचा प्रश्न सोडवू असे आश्वासन कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना दिले आहे.   संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन गेल्या ३ महिन्यांपासून निधी नसल्याचे कारण देऊन कुलगुरूंनी बंद केले आहे. यापार्श्वभुमीवर अधिसभा सदस्य प्रा. शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात, अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर, विश्वनाथ पडवी, अनिल विखे, डॉ. तानाजी वाघ आदी ९ सदस्यांनी कुलगुरूंना सोमवारी निवेदन दिले. कुलगुरूंनी विद्यावेतनाचा प्रश्न येत्या १५ दिवसात न सोडविल्यास सिनेट सदस्यांकडून तीव्र आंदोलन व उपोषण केले जाईल असा इशारा या निवेदनामध्ये देण्यात आला आहे.  विद्यापीठातील पीएचडीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार तर एमफिलच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५ हजार रूपये विद्यावेतन दिले जात होते. गेल्या दहा वर्षांपासून हे विद्यावेतन दिले जात आहे. मात्र ते अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून विद्यावेतनासाठी दिले जाणारे अनुदान बंद झाल्यानंतर तत्कालीन कुलगुरू वासुदेव गाडे यांनी विद्यार्थी हिताचा विचार करून विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र डॉ. नितीन करमळकर यांनी मात्र ते बंद करण्याचा निर्णय घेतल्याने संशोधक विद्यार्थी अडचणीत आले आहेत.विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंन्ट असोसिएशन (डाप्सा), नॅशनल स्टुडंन्ट युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय), राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व इतर संघटनांच्या विद्यार्थ्यांनी विद्यावेतन सुरू करावे या मागणीसाठी भिक माँगो आंदोलन करून गोळा केलेले पैसे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्याकडे दिले होते. मात्र डॉ. उमराणी यांनी ते पैसे स्वीकारले नाहीत. विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू केले जाईल असे आश्वासन सातत्याने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ....................सार्वजनिक कार्यक्रमांमधील आश्वासनांचे काय झाले?कुलगुरू डॉ. नितीन करमळकर जाहीर कार्यक्रमामध्ये आपण विद्यार्थी हिताचे कार्यक्रम घेतले जातील असे आश्वासन वारंवार देत असतात. मात्र प्रत्यक्षात संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यावेतन बंद करून विद्यार्थी हिताच्या विरोधात कसा निर्णय घेतला जात आहे अशी विचारणा अधिसभा  सदस्य प्रा. शामकांत देशमुख, डॉ. संजय खरात, अभिषेक बोके, संतोष ढोरे, शशिकांत तिकोटे, दादाभाऊ शिनलकर, विश्वनाथ पडवी, अनिल विखे, डॉ. तानाजी वाघ यांनी केली आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठnitin karmalkarनितीन करमळकरStudentविद्यार्थी