शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूलतेला अनुकूल कसे बनवावे, हे छत्रपती संभाजी राजांकडून शिकावे : नितीन बानगुडे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 16:26 IST

आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करता आला पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले. 'आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान'च्या स्नेहमेळाव्यात पाटील बोलत होते.

ठळक मुद्देशिवरायांकडून कसे जगावे हे शिकावे, संभाजी राजांकडून कसे मरावे हे शिकावे : नितीन बानगुडे पाटील'आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान'चा दहाव्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळावा

पुणे : शिवरायांकडून कसे जगावे हे शिकावे, तर संभाजी राजांकडून कसे मरावे हे शिकावे. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करावी हे छत्रपती संभाजी राजांचे चरित्र अभ्यासले की लक्षात येते. आपला इतिहास उज्ज्वल आहे. तसाच आपला वर्तमान व भविष्यकाळही उज्ज्वल करता आला पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.'आम्ही मुळशीकर प्रतिष्ठान'च्या वतीने दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात प्रा. बानगुडे-पाटील बोलत होते. यावेळी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना मुळशी गौरव पुरस्कार २०१७ या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. गणेश  सातपुते, पोलीस क्षेत्रात राष्ट्रपती पदक मिळविलेले कैलास मोहोळ, महेंद्र राजभोज, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा तिसरा विजेता मुन्ना झुंझर्के, कुस्तीपटू शंकर कंधारे, प्रमोद मांडेकर, विधितज्ज्ञ राम धुमाळ, विकास ढोक, निवृत्ती येवले, मनोज फाटक, माऊली डफळ, राम गायकवाड, सिताराम धोंडे-पाटील, लक्ष्मण कंधारे, उमेश सातपुते आणि मुळशीकर प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी गुरुकुल संकुल उभारणारे आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु शंकर कंदारे, अत्याधुनिक पद्धतीने शेती करणारे प्रमोद मांडेकर, पोलीस क्षेत्रात राष्ट्रपती पदक मिळविलेले कैलास मोहोळ, आठवीमध्ये शिकत असलेला जलतरण स्पर्धेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५० पारितोषिकांचा मानकरी नतीश कुडले, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा तिसरा विजेता मुन्ना झुंझुर्के यांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून वर्धापदिन साजरा करत असलेल्या मुळशीकर परिवाराचे ग्रामीण भागातील लोकांना एकत्रित आणून त्यांचा विकास करणे हे वैशिष्ट्यपूर्ण काम आहे. पुणे जिल्ह्यातील काश्मीर म्हणून ओळखले जाणारे मुळशी आहे. अशा शब्दात मुळशीचे वर्णन करत प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी आपल्या मातीतल्या माणसांचा सन्मान केला.मुळशीचा विकास करणे, हेच आपले ध्येय असल्याचे आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nitin Banugade-Patilनितीन बानुगडे-पाटीलPuneपुणे