न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम चरित्र ग्रंथाचे लेखन : जयसिंगराव पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 05:01 PM2017-08-27T17:01:30+5:302017-08-27T17:16:31+5:30

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्युनंतर ११ वर्षे मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी लढा देणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी ३0 आॅगस्ट रोजी होणार आहे. ग्रंथलेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

Writing of Chhatrapati Rajaram Character Grantha for Shiva Pratikraman: Jayasingrao Pawar | न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम चरित्र ग्रंथाचे लेखन : जयसिंगराव पवार

न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम चरित्र ग्रंथाचे लेखन : जयसिंगराव पवार

Next
ठळक मुद्देजयसिंगराव पवार यांची माहितीश्री शाहू छत्रपती, राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती

कोल्हापूर : छत्रपती संभाजीराजे यांच्या मृत्युनंतर ११ वर्षे मराठ्यांचे राज्य राखण्यासाठी लढा देणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठीच शिवपुत्र छत्रपती राजाराम या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन बुधवारी ३0 आॅगस्ट रोजी होणार आहे. ग्रंथलेखक डॉ. जयसिंगराव पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.


श्री शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ६ वाजता होणाºया या समारंभासाठी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


या ग्रंथाबाबत माहिती देताना डॉ. पवार म्हणाले, शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी उत्तरेतून धावत आला. यानंतर संभाजीराजे, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांनी २७ वर्षे लढा दिला. यातील संभाजीराजेंची दखल इतिहासकारांनी घेतली. मात्र राजाराम महाराज आणि ताराराणी यांना उपेक्षित ठेवले.


दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा ठेवणाºया राजाराम महाराजांना न्याय देण्यासाठी हा गं्रथ लिहण्यात आला आहे. खानदेश बागलाणपासून जिंजी तंजावरपर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात त्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या फौजांश्ी लढाया केल्या आणि नेत्रदीपक विजय मिळवले. संभाजीराजांच्या हत्येनंतर दूर तामिळनाडूत जिंजी किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी स्थापन करून हा किल्ला ८ वर्षे लढवला.


अतिशय संकटाच्या काळामध्ये हिंमत न हारता दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणाºया राजाराम महाराजांच्या या चरित्रासाठी मराठीबरोबरच फारसी, इंग्रजी, फें्रच व पोर्तुगीज कागदपत्रांचा व ग्रंथांचा आधार घेण्यात आला आहे. १00 हून अधिक चित्रे, छायाचित्रे, नकाशे याचा या ग्रंथामध्ये समावेश करण्यात आला असल्याचे डॉ. जयसिंगराव पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीचे विश्वस्त सुरेश शिप्पूरकर यांनी स्वागत केले. तर डॉ. मंजुश्री पवार यांनी आभार मानले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. विजय शिंदे, डॉ. प्रकाश शिंदे, पृथ्वीराज पवार, पंडित कंदले उपस्थित होते.

 

Web Title: Writing of Chhatrapati Rajaram Character Grantha for Shiva Pratikraman: Jayasingrao Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.