माळेगावमध्ये उभारले निर्माल्य कुंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST2021-09-19T04:11:15+5:302021-09-19T04:11:15+5:30
माळेगावचे आता नगर पंचायतमधे रुपांतर झाले आहे. पूर्वी सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणपती नीरा डावा कालवा व परिसरातील ...

माळेगावमध्ये उभारले निर्माल्य कुंड
माळेगावचे आता नगर पंचायतमधे रुपांतर झाले आहे. पूर्वी सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणपती नीरा डावा कालवा व परिसरातील विहिरीमध्ये गणेश विसर्जन केले जात होते, यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन जलसाठे खराब होत होते. मात्र, नगर पंचायत होताच मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी गणेश विसर्जनासाठी नगरपंचायत कार्यालयाशेजारी, साठवण तलाव माळेगाव खुर्द रोड व माळेगाव कारखाना येथे विसर्जन तलाव व निर्माल्य कुंड उभारण्यात आले आहेत. तरी इतर ठिकाणी विसर्जन न करता या तीन ठिकाणी विसर्जन करावे व निसर्गाचे जतन करावे, असे आवाहन केले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राहुल घुगे म्हणाले की, शासनाने गणपती विसर्जनाबाबतीत नियम व अटी लागू केलेल्या असून, त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून विसर्जन करावे, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल.
नगर पंचायत कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेला विसर्जन तलाव व निर्माल्य कुंड.
१८०९२०२१-बारामती-१०