शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील पुलांवरचे निर्माल्य कलश झाले गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 20:55 IST

महापालिकेच्या वतीने दर वर्षी लाखो रुपये खर्च करून निर्माल्य कलश खरेदी केले जातात.परंतु सध्या सर्व कलश गायब झाले आहेत.

ठळक मुद्देउदासिन प्रशासनामुळे ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ फलकांवरच प्रदूषण टाळण्यासाठी महापालिका, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून काही वर्षांपासून जनजागृती मोहीमसर्व पुलांवर निर्माल्य कलशामध्ये टाकण्याचे आवाहन करणारे फलक

पुणे : पुण्याचे सौदर्य असलेल्या मुळा-मुठेचे प्रदुषण टाळण्यासाठी व आपले शहर ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ ठेवण्यासाठी नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता शहरातील सर्व पुलांजवळ ठेवलेल्या निर्माल कलशात टाकण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने ठिक-ठिकाणी फलक लावून केले आहे. परंतु शहरातील पुलांवरील हे निर्माल्य कलश गायब झाल्याने नुकत्याच साजऱ्या झालेल्या दसऱ्यामुळे घराघरात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले निर्माल्य नागरिकांनी नदी न टाकता पुलांवरच टाकले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे निर्माल्यपुलांवर पडून असून, महापालिकेच्या उदासिन प्रशासनामुळे ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ केवळ फलकांवर राहिले आहे.शहरामध्ये नुकताच नऊ दिवसांचा नवरात्री उत्सव साजरा झाला. नवरात्रीनिमित्त शहरातील घराघरांमध्ये देवीचा घट बसविला जातो. या घटाला दररोज फुलांच्या माळा घातल्या जातात. दसऱ्याच्या दिवशी देवीच्या या घटाला दाखवून नैवद्य उठविला जातो. या घटामुळे व दस-या निमित्त देवाला, दाराला, गाड्यांना फुलांचे हार घातले जातात. यामुळे गणपती प्रमाणेच नवरात्रीत देखील घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. निर्माल्य देवाचे असल्याने ते कच-यात न टाकता नदी टाकण्याची लोकांची धार्मिक भावना असते. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माल्य नदीत टाकल्यास नदीचे प्रदूषण होऊ शकते. हे टाळण्यासाठी महापालिका, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून जनजागृती मोहीम राबवली. शाळा, महाविद्यालय, सोसायट्यांमध्ये कार्यक्रम घेऊन पुणेकरांनी निर्माल्य नदीत न टाकता शहराच्या विविध भागात, पुलांवर ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशामध्ये टाकावे, असे आवाहन करण्यात आले. यामुळे पुणेकर नागरिक देखील सजग झाले असून, प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य कलश शोधत असतात. परंतु सध्या शहरातील सर्व पुलांवरील निर्माल्य कलश गायब झाले आहेत. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे निर्माल्य नदीत टाकून नदीचे प्रदुषण होऊ नये म्हणून निर्माल्य कलशामध्ये टाकण्याचे आवाहन करणारे फलक सर्व पुलांवर लावण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने दर वर्षी लाखो रुपये खर्च करून निर्माल्य कलश खरेदी केले जातात.परंतु सध्या सर्व कलश गायब झाले आहेत. यामुळे शुक्रवारी (दि.१९) रोजी शहरातील सर्व पुलांवर निर्माल्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. नागरिकांनी निर्माल्य नदीत न टाकता पुलावर कलश असल्याचे फलक लावलेल्या ठिकाणी पिशव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हे निर्माल्य पुलांवरच टाकले आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांकडून या निर्माल्याच्या पिशव्या पुलांवर अस्ताव्यस्त झाल्या आहेत.हे चित्र शहरातील सर्व पुलांवर व कॅनॉलच्या लगत दिसत आहे.

टॅग्स :PuneपुणेNavratriनवरात्रीmula muthaमुळा मुठा