साबळेवाडीतील कामांची निर्मला पानसरेंकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:13 IST2021-08-19T04:13:12+5:302021-08-19T04:13:12+5:30
साबळेवाडीत पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्मला पानसरे यांनी विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून अंबिका माता मंदिर विस्तारीकरण, ...

साबळेवाडीतील कामांची निर्मला पानसरेंकडून पाहणी
साबळेवाडीत पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निर्मला पानसरे यांनी विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून अंबिका माता मंदिर विस्तारीकरण, अंबिका माता मंदिराशेजारी खोली बांधणे, मंदिराकडे जाणाऱ्या दोन रस्त्यांचे, तसेच अंतर्गत रस्त्यांचे काम केले जात आहे. या कामांची पानसरेंनी भेट देऊन पाहणी करत ग्रामस्थांकडून कामांचा आढावा घेतला.
याप्रसंगी माजी चेअरमन पंकजबापू हरगुडे, माजी उपसरपंच बबनराव काटकर, देवस्थानचे अध्यक्ष संतोष शेटे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुखदेव पानसरे, पोलीस पाटील ॲड. काळूराम साबळे, खजिनदार राजेश म्हस्के, अशोक काटकर, विश्वस्त चंद्रकांत काटकर, एकनाथ साबळे, संपत काटकर, बाळासो काटकर, भानुदास काटकर, हिरामण काटकर, मोहन साबळे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
१८ शेलपिंपळगाव साबळेवाडी
साबळेवाडी येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून सुरू असलेल्या कामांची पाहणी करताना निर्मला पानसरे समवेत ग्रामस्थ.