नऊ पंचायती राष्ट्रवादीने राखल्या

By Admin | Updated: September 15, 2014 05:11 IST2014-09-15T05:11:46+5:302014-09-15T05:11:46+5:30

जिल्ह्यातील १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आल्याने राष्ट्रवादीने जागा राखल्या

Nine Panchayati Rashtravd maintained | नऊ पंचायती राष्ट्रवादीने राखल्या

नऊ पंचायती राष्ट्रवादीने राखल्या

पुणे/मावळ : जिल्ह्यातील १३ पैकी ९ पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती निवडून आल्याने राष्ट्रवादीने जागा राखल्या. हवेली व पुरंदर पंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली.खेडमध्ये मित्रपक्ष काँग्रेसशी,तर भोरमध्ये शिवसेनेशी, तर पुरंदरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी तडजोड करून त्यांना उपसभापतिपद दिले.
मावळमध्ये भाजपाचे पूर्वीप्रमाणेच दौंड तालुक्यात राहुल कुल यांच्या गटातील एक सदस्य आमदार रमेश थोरात यांच्या गटाने फोडल्याने या पंचायतीवर सभापती, उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचेच सदस्य निवडून आले. दौंड पंचायत समितीत आमदार रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ७, तर भीमा-पाटसचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली नागरिक हित संरक्षण मंडळ आरपीआय युतीचे ७ असे समसमान बलाबल आहे. नागरिक हित संरक्षण मंडळ आणि आरपीआय युतीचे सदस्य सत्त्वशील शितोळे गैरहजर राहिल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यात पंचायत समिती आली.
इंदापूर आणि वेल्हा पंचायतीवर काँग्रेसचे सभापती, उपसभापती, जुन्नर पंचायतीवर शिवसेनेचा सभापती, काँग्रेसची महिला सदस्य उपसभापती, खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेला सदस्य सभापती व उपसभापती काँग्रेसचा, असे चित्र आहे. भोरमध्ये शिवसेनेला, तर पुरंदरमध्ये मनसेला उपसभापतिपद अशी तडजोड राष्ट्रवादी काँग्रेसने करीत आपल्या गेल्या वेळच्या ९ समित्या ताब्यात राखल्या.(प्रतिनिधी)

Web Title: Nine Panchayati Rashtravd maintained