शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
6
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
7
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
8
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
9
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
10
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
12
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
13
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
14
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
15
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
16
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
17
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
18
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
19
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य

प्रकाश आण्णा गोंधळे खूनप्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या ९ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 14:46 IST

सत्र न्यायाधीश के.पी नांदेडकर यांनी हा निकाल दिला...

पुणे : हडपसर येथील प्रकाश आण्णा गोंधळे यांच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायाधीश के.पी नांदेडकर यांनी हा निकाल दिला.

आरोपींना भा.दं.वि कलम 302 तसेच 506 (2) अंतर्गत दोन वर्षे, फौजदारी कायद्यातील कलम 7 च्या तरतुदीनुसार 6 महिने आणि प्रत्येकी आरोपीला 20 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला असून, दंडाव्यतिरिक्त आरोपींनी 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम गोंधळे यांच्या कुटुंबियांना द्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते विकी जाधव,  वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे ,अमोल शेगडे, राहुल कौले, विकी पाटील, सूरज फडके, आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

ही घटना 2013 ची आहे. जूनमध्ये प्रकाश आण्णा गोंधळे यांच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात त्यांनी दरवाजावर पेट्रोल टाकून दरवाजा जाळण्यात आला होता. घरात जाऊनघराचे नुकसान केले होते. या प्रकरणाची  फिर्याद प्रकाश आण्णा गोंधळे हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. त्या नंतर सतत त्याचा पाठपुरावा घेऊनही आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. 8 जुलै 2013 रोजी  रात्रीपावणे अकराच्या सुमारास प्रकाश आण्णा हे नेहमी प्रमाने रेशनिंग दुकाना वरून त्यांचा घरी चाले होते. त्यांना आरोपींनी अडवून त्यांच्यावर कोयत्याने  वार करत जीव घेणा हल्ला केला व त्या हल्ल्ल्यामध्ये प्रकाश आण्णा ह्यांचा मृत्यू झाला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर या केसमधील फियार्दी, साक्षीदार, पंच यांना केसमध्ये लक्ष घालू नका अशा प्रकारच्या धमक्या  येत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा सर्व प्रकार सांगितला व त्यांनी लक्ष घालत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या केस मध्ये नियुक्ती केली.

खटल्याचे कामकाज चालू असताना 18 जानेवारी2020 रोजी फिर्यादी राजेंद्र पिंगळे यांनी फियार्दी साक्ष देऊ नये म्हणून त्यांच्या मुलाला ऋषिकेश पिंगळे या वर सुद्धा जीव घेणा हल्ला करण्यात आला, केससाठी कोर्टात आलेल्या पंच साक्षीदारांवर  सुद्धा आरोपी किंवा त्यांचे मित्र यांच्याकडून दबाव टाकण्यात येत होते. नांदेडकर कोर्टात  केस मध्ये एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले.

प्रकाश आण्णा वर केलेला  हल्ला हा अतिशय क्रूर आहे व फियार्दी वर सुद्धा हल्ला करण्यात आला आहे, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला. तो ग्राहय धरीत म्हणून सत्र न्यायाधीश नांदेडकर यांनी सर्व आरोपींनामरेपर्यंत जन्मठेप शिक्षा ठोठावली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीUjjwal Nikamउज्ज्वल निकम