शिरूर तालुक्यामध्ये नऊ ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:27+5:302021-01-08T04:31:27+5:30
शिरूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २६२२ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. या एकूण उमेदवारांपैकी ९ गावांतील उमेदवारांनी ...

शिरूर तालुक्यामध्ये नऊ ग्रामपंचायती बिनविरोध
शिरूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २६२२ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. या एकूण उमेदवारांपैकी ९ गावांतील उमेदवारांनी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे ९ ग्रामपंचायतींचे सदस्यांची बिनविरोध निवड झाली.
शिरूर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण २६६७ उमेदवारानी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्जाची आज छाननी करण्यात आली. त्यात ४५ उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. तालुक्यातील निमगाव दुडे, रावडेवाडी, चांडोह, फाकटे, वडनेर खुर्द, नागरगाव, आंधळगाव, पिंपळसुटी, कुरूळी, गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रुक, कोळगाव डोळस, निर्वी, चिंचणी, गुनाट, शिंदोडी, चिंचोली मोराची, वरुडे, निमगाव भोगी, दहिवडी, जातेगाव बुद्रुक, जातेगाव खुर्द, मुखई, भांबर्डे, गणेगाव खालसा ,बुरुंजवाडी, बाभूळसर खुर्द, गोलेगाव, करंदी, पिंपळे जगताप, खैरेवाडी, मिडगुलवाडी, पिंपळे खालसा, कान्हूर मेसाई, केंदूर, पाबळ, धामारी, वडगाव रासाई, इनामगाव, शिरसगाव काटा, न्हावरे, आलेगाव पागा, उरळगाव, सविंदणे, मलठण, कवठे येमाई, निमगाव म्हाळुंगी, विठ्ठलवाडी, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, पारोडी ,टाकळी भीमा, खंडाळे, वाघाळे, पिंपरी दुमाला, कोंढापुरी, निमोणे, कारेगाव, वढू बुद्रुक, सणसवाडी, कोरेगाव भीमा, दरेकरवाडी या ६२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून एकूण ५१६ ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे असल्याचे तहसीलदार लैला शेख यानी सांगितले.