शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनअभावी नौसैैनिक त्रस्त, न्यायालयाचे आदेश : सरकारचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 01:22 IST

उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी युद्दात सहभागी असलेल्या नौसैैनिकांना पेन्शन देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने ५३० सैनिक पात्र ठरवले आहेत, तर सुमारे तीन हजार सैैनिकांना अपात्र ठरवले आहे

पिंपरी : १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील अनेक नौसैैनिकांना अद्याप पेन्शन मिळाली नाही. उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही सरकारकडून त्याची अमंलबजावणी होत नसल्याचा आरोप निवृत्त नेव्ही पोलीस प्रकाशचंद्र तेलंग यांनी केला आहे.

उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी युद्दात सहभागी असलेल्या नौसैैनिकांना पेन्शन देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सरकारने ५३० सैनिक पात्र ठरवले आहेत, तर सुमारे तीन हजार सैैनिकांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे देशाच्या संरक्षणासाठी सैैन्यात सामील झालेल्या सैैनिकांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत. १९७१ च्या युद्दावेळी नवीन सैैनिकांची नेव्हीमध्ये भरती करण्यात आली. त्या वेळी दहा अधिक दहा या नियमाने सैैनिकांची भरती केली. म्हणजेच दहा वर्ष नोकरी व दहा वर्ष रिझर्व्ह सर्व्हिस या नियमाने सैैनिकांची भरती करण्यात आली. मंत्रालयातील नेव्ही विभागाने सैैनिकांबरोबर करार केला होता. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारकडून या सैैनिकांना पेन्शन देणे बंधनकारक होते. मात्र सैैनिकांबरोबर जो करार झाला होता तो सरकारने परस्पर रद्द केल्यामुळे हे नौसैैनिक पेन्शनसाठी अपात्र ठरत आहेत. ठरलेल्या १० अधिक १० या नियमाऐवजी युद्धानंतर या सैैनिकांकडून संमतीपूर्वक नोकरी सोडण्याचे पत्रक घेण्यात आले. त्याचाच आधार घेऊन सुरक्षा मंत्रालय पेन्शन देण्यास नकार देत आहे. १९७१ च्या युद्दावेळी नवीन सैैनिकांची नेव्हीमध्ये भरती करण्यात आली. त्या वेळी दहा अधिक दहा या नियमाने सैैनिकांची भरती केली. म्हणजेच दहा वर्ष नोकरी व दहा वर्ष रिझर्व्ह सर्व्हिस या नियमाने सैैनिकांची भरती करण्यात आली होती, असेही नौसैैनिकांनी सांगितले.न्यायालयाचे आदेश : सरकारचे दुर्लक्षगेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पेन्शनपासून वंचित आहोत. मात्र याची दखल कुठलेच प्रशासन घेत नाही. न्यायालयाने पेन्शन देण्याचे आदेश दिल्यानंतरही आम्हाला सरकारकडून पेन्शन नाकारली जात आहे.- उल्हास सुर्वे, सेवानिवृत्त सीमन

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय