निमोणे लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:07+5:302021-04-11T04:12:07+5:30
निमोणे गावात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला होता. शिवाय परिसरात कोरोना रुग्णांसाठी ना बेड ...

निमोणे लॉकडाऊन
निमोणे गावात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला होता. शिवाय परिसरात कोरोना रुग्णांसाठी ना बेड मिळत होते ना त्यांना आवश्यक रेमडेसिवीर औषध मिळत होते. त्यामुळे दक्षता घेण्याशिवाय गावकरऱ्यांकडे पर्याय राहिला नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी ब्रेक करण्याचा निर्धार करुनच गावकऱ्यांनी आज कडकडीत बंद पाडला. गावात अत्यावश्यक सेवेवेतील औषधांची दुकाने वगळता बाकी सर्व होते. सकाळी सात ते अकरा यावेळेतच दुध संकलन केंद्रे सुरु होती व दिवसभर दवाखाने सुरु होते. ग्रामसेवक एल. के. जगदाळे व कर्मचाऱ्यांनी मनोज मुर्तिमोढे यांनी नागरिकांचे आभार मानले
--
फोटो क्रमांक : १० निमोणे लॉकडाऊन
फोटो : निमोणे (ता शिरूर ) येथे दुकानदारांना मार्गदर्शन करताना ग्रामसेवक एल . के . जगदाळे व कर्मचारी .