निम्हण यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

By Admin | Updated: July 11, 2015 05:19 IST2015-07-11T05:15:37+5:302015-07-11T05:19:24+5:30

शिवसेनेच्या वतीने गुरुवारी पोलीस आयुक्तालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्यासह दीड हजार कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Nimhan and the activists committed crime | निम्हण यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

निम्हण यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा

निम्हण यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा
पुणे : शिवसेनेच्या वतीने गुरुवारी पोलीस आयुक्तालयावर काढण्यात आलेल्या मोर्चाप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी शहरप्रमुख विनायक निम्हण यांच्यासह दीड हजार कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहराध्यक्ष विनायक निम्हण, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका दीपाली ओसवाल, राधिका हरिश्चंद्रे, बाळा ओसवाल, तानाजी लोणकर, अजय भोसले, संजय भोसले, सचिन भगत, अर्जुन जानगवळी, अमोल हरपळे, मिलिंद एकबोटे यांचाही गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
पर्वतीदर्शन परिसरात दोन गटांत झालेल्या हाणामारी व मिलिंद एकबोटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने लाल देऊळ ते पोलीस आयुक्तालय असा मोर्चा काढला होता. जमावबंदी आदेश झुगारून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉटरी लागल्याच्या आमिषाने फसवणूक
(प्रतिनिधी)

Web Title: Nimhan and the activists committed crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.