निमगावसावा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:14 IST2021-08-12T04:14:59+5:302021-08-12T04:14:59+5:30

श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील अजिंक्य शिवाजी गुंजाळ ८७ टक्के, अक्षदा गाडगे ८५ टक्के, प्रतीक्षा डावखर ...

Nimgavasava meritorious students | निमगावसावा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

निमगावसावा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील अजिंक्य शिवाजी गुंजाळ ८७ टक्के, अक्षदा गाडगे ८५ टक्के, प्रतीक्षा डावखर ८२ टक्के, अलिशा तांबोळी ७८ टक्के, पल्लवी गाडगे ७७ टक्के, विज्ञान शाखेमधील ओमकार थोरात ८८ टक्के, दीपक डुकरे ८७ टक्के, श्रेयस साळवे ८१ टक्के, अजिंक्य आल्हाट ८० टक्के, हर्षदा जावळे ७९ टक्के या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुस्तक व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ओमकार थोरात या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतात महाविद्यालय व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी संस्था सचिव गणपत घोडे, संदीपान पवार, प्राचार्य वसंत गाडगे, प्रकाश जावळे, संतोष डुकरे, प्रा. अनिल पडवळ, प्रा. शिवाजी साळवे, प्रा. आशिष गाडगे, प्रा. नयना पावडे, योगेश देवकर, विजय लामखडे, रोहित दळे, ऋतुजा गहीने उपस्थित होते.

निमगावसावा (ता. जुन्नर) येथील विद्यार्थ्यांचा सत्कार करताना पांडुरंग पवार.

Web Title: Nimgavasava meritorious students