शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळच्या अडचणीत वाढ; पुणे पोलिसांचे UK हाय कमिशनला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:09 IST

पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळ लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्वासन त्यांना मिळाले आहे

पुणे: पुणे पोलिसांनी निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या परदेशात असल्याची माहिती आहे. पूर्वीच निलेश घायवळविरुद्ध रेड कॉर्नर आणि ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला असून, आता ट्रॅकिंग प्रक्रिया सुरू आहे. अशातच निलेश घायवळबाबत नवी माहिती समोर आली आहे. 

पुणे पोलिसांनी युके हाय कमिशनला पत्र लिहिले आहे. निलेश घायवळला परत भारतात पाठवावे, असे पत्रात पोलिसांनी नमूद केले आहे. युके हाय कमिशनकडून निलेश घायवळचा ट्रॅकिंग सुरू करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घायवळ लवकरच भारतात परतणार असल्याचे आश्वासन त्यांना मिळाले आहे.

 गुंड निलेश घायवळ याच्यावर पुणे पोलिसांकडून आतापर्यंत वेगवेगळ्या गंभीर प्रकाराचे दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून निलेशची आर्थिक बाजू कमकुवत करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न सुरू आहेत.  मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुंड निलेश घायवळ सध्या परदेशात आहे. त्याने घायवळ ऐवजी गायवळ नावाचा वापर करत पासपोर्ट मिळवण्याचे यापूर्वीच पोलिस तपासात समोर आले आहे.  त्याने ‘ घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असे नाव त्याने पारपत्र मिळवताना वापरले आहे. 

घायवळ याचे कोथरूडमधील शास्त्रीनगर भागात घर आहे. त्याचे घर आणि कार्यालयाची झडती कोथरूड पोलिसांनी नुकतीच घेतली होती. घरातून पोलिसांनी दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. पोलिसांनी घायवळ याच्या घरातून धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. कोथरूड भागात नव्याने बांधण्यात आलेल्या एका इमारतीतील दहा सदनिका जबरदस्तीने बळकावल्याप्रकरणी घायवळ, त्याचा भाऊ सचिन याच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सचिन याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nilesh Ghaiwal's Troubles Increase: Pune Police Write to UK High Commission

Web Summary : Pune police escalated efforts to bring Nilesh Ghaiwal back to India, writing to the UK High Commission. Ghaiwal, wanted on multiple charges including MCOCA, is believed to be in the UK. Police have seized assets and are tracking him, anticipating his return.
टॅग्स :Puneपुणेkothrud policeकोथरूड पोलीसUnited Kingdomयुनायटेड किंग्डमCrime Newsगुन्हेगारीArrestअटकInternationalआंतरराष्ट्रीय