शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळा शहरासह मावळ तालुक्यात २५ डिसेंबर ते ५ जानेवारी 'नाईट कर्फ्यू' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 17:06 IST

ख्रिसमस व थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय 

ठळक मुद्देशासनाचा नाईट कर्फ्यूचा आदेश आल्याने सर्व नियोजनावर पाणी फिरणार; व्यावसायकांची नाराजी

लोणावळा : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महानगरपालिका हद्दींमध्ये नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुणे ग्रामीण जिल्ह्यातील लोणावळा, अँम्बे व्हॅली, लवासा, भुशी धरण, मुळशी धरण, ताम्हाणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटनस्थळी तसेच फार्महाऊस, रिसाॅर्ट आदी ठिकाणी 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेत पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी मावळ, मुळशी व हवेली तालुक्यात 25 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 दरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 पर्यत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. 

पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी मावळ, मुळशी व हवेली तालुक्यातील सर्व कार्यक्षेत्रात व शिरुर तालुक्यातील काही गावांमध्ये 25 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 दरम्यान रोज रात्री 11 ते सकाळी 6 पर्यत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वेय जमावबंदीचा आदेश पारित केला आहे. या सर्व ठिकाणी आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे.

व्यावसायिकांची नाराजी...

मागील सात ते आठ महिन्यापासून लोणावळा व परिसरातील सर्व हाॅटेल व फार्महाऊस तसेच पर्यटनस्थळे बंद होती. ख्रिसमस व थर्टी फस्टच्या पार्ट्यांकरिता लोणावळा, पवनानगर व मावळातील इतर पर्यटनस्थळे व व्यावसायिक सज्ज झाले होते. बहुतांश ठिकाणी बुकिंग पुर्ण झाले होते. अशातच शासनाचा नाईट कर्फ्यूचा आदेश आल्याने सर्व नियोजनावर पाणी फिरणार असल्याने व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाcollectorजिल्हाधिकारीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसhotelहॉटेलtourismपर्यटन