शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणारा नायजेरियन जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 20:38 IST

फेसबुकवर मैत्री करून गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली आहे़.

ठळक मुद्देमागील दीड वर्षांपासून फिर्यादींशी फेसबुकवर आरोपीची ओळख दिल्लीतील उत्तमनगर येथून अत्से सर्ज ताब्यात

पुणे : फेसबुकवर मैत्री करून गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली आहे़. अत्से सर्ज (वय ३०, रा़ दिल्ली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून १७ मोबाईल हँडसेट्स, सिमकार्ड, ६ डेबिट कार्ड, ४ पासबुक, १ चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्याद देणारी व्यक्ती एका हॉटेलमध्ये नोकरी करतात. मागील दीड वर्षांपासून त्यांची फेसबुकवर त्या व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यानंतर त्याच्याशी चॅटिंंग सुरु झाली. मे २०१८ मध्ये त्यांना त्या व्यक्तीने व्हाटस अपवर पार्सलचे फोटो पाठवले़. त्यानंतर एक आठवड्यानंतर दिल्ली एअरपोर्ट आॅफिसमधून प्रिया शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने फोन करून पार्सलमध्ये परदेशी चलन आहे, असे सांगितले. ते मिळविण्यासाठी त्यांना १ लाख १७ हजार रुपये खात्यात भरण्यास भाग पाडत फसवणूक केली. या प्रकरणाचा समांतर तपास सायबर गुन्हे शाखेकडून सुरु होता. त्यावेळी मोबाईल कंपनी आणि बँकेशी पत्रव्यवहार करून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तांत्रिक अभ्यास करत फसवणूक करणारा दिल्लीचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अत्से सर्ज याला दिल्लीतील उत्तमनगर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे, पोलिस निरीक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण औटी, नीतीन खामगळ, कर्मचारी शिरीष गावडे, अतुल लोखंडे व इतर कर्मचारी यांच्या पथकाने केली.

टॅग्स :PuneपुणेFacebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस