फसवणूक केल्याप्रकरणी नायजेरियन व्यक्तीला ३ वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST2021-07-10T04:09:29+5:302021-07-10T04:09:29+5:30
नमोए ओमोरूई ऊर्फ डॉ. पॉल नेलसन (वय ३८, रा. तिलकनगर, नवी दिल्ली. मूळ रा. नायजेरीया) असे शिक्षा झालेल्याचे नाव ...

फसवणूक केल्याप्रकरणी नायजेरियन व्यक्तीला ३ वर्षे कारावास
नमोए ओमोरूई ऊर्फ डॉ. पॉल नेलसन (वय ३८, रा. तिलकनगर, नवी दिल्ली. मूळ रा. नायजेरीया) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. ११ एप्रिल ते २९ मे २०१८ दरम्यान कसबा पेठ परिसरात हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाईल नंबरवर संदेश पाठवून त्यांना भाग्यवान विजेत्या संबोधून १ कोटी ७० लाख रुपयांचे बक्षीस लागल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून नाव, पत्ता, मोबाईल तसेच बँकेच्या खात्याची माहिती ईमेलद्वारे मागविली. फिर्यादी यांनी ती पाठविल्यानंतर वेळोवेळी खोटी माहिती देऊन वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये १६ लाख ३२ हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणात आरोपीला अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. तर, त्याच्या अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के यांनी या प्रकरणाचा तपास केला.
---------------