शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Nigdi Tanker Accident: भरधाव वेगाने तो आला, आडवा झाला, झोप उडवून गेला; निगडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 13:21 IST

पुलावरच सुटला त्याचे नियंत्रण....

- विश्वास मोरे

पिंपरी : साखर झोपेची वेळ असताना रविवारची पहाटे तीनच्या सुमारास सुमारे अठरा टन गॅसने भरलेला टँकर दुभाजकाला धडकला आणि रस्त्यावरच आडवा झाला. त्यातून गॅस गळती सुरू झाली. ही वार्ता परिसरात पसली आणि वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे निगडी प्राधिकरणातील नागरिकांची झोप उडाली. त्यानंतर अधून-मधून कोसळणारा पाऊस, भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने अरूंद झालेला रस्ता अशा अडचणींचा सामना करीत अग्निनिशमन दल, पोलिस, आपत्ता व्यवस्थानाच्या जवानांना सुमारे बारा तास प्रयत्नांची शिकस्त करीत गॅस गळती रोखली. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मुंबईकडून-पुण्याकडे जाताना निगडीतील भक्ती-भक्ती उड्डाणपुल आणि टिळक चौकातील मधुकर पवळे उड्डाणपूलापूर्वी प्राधिकरणातून यमुनानगर किंवा निगडी गावठाणात जाण्यासाठी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्यास जाताना भक्ती शक्ती उड्डाणपुल संपतो तिथे रस्ता वळविण्यात आला आहे. शंभर ते दोनशे मीटरच्या जागेत वळण तयार केलेले आहे. तसेच रस्ताही अरूंद झाला आहे.पुलावरच सुटला त्याचे नियंत्रणमुंबईहून पुण्याच्या दिशेने चाललेल्या भारत गॅसच्या टँकरमध्ये १७.८०० द्रवरूप गॅस भरण्यात आला होता. भक्ती-शक्ती उड्डाणपूल ओलांडून उतरत असताना  द्रवरूप गॅसने भरलेल्या टँकरवरील नियंत्रण राजेंद्र प्रसाद यादव यांचे नियंत्रण सुटले त्यामुळे तिन गतीरोधक असतानाही त्यावरून आदळत थेट टँकर वेगाने खाली आला. जिथे रस्ता संपतो तिथे रस्त्याच्या कामामुळे वळण निर्माण केले आहे. टँकरवरील ताबा सुटल्याने पहिल्यांदा दुभाजकाला धडकून वळणावरच पलटी झाला. त्यात चालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर घटनास्थळावरील नागरिकांनी पोलिस आणि अग्निशमक दलास कळविले.असा आहे घटनाक्रम१) पहाटे ३.१० वाजता -टँकर पलटी२) पहाटे ३.१५ मिनिटे -पोलिस पथक दाखल३) ३.२१ मिनिटे- अग्निशमन दलास कॉल-४) पहाटे -३.३०- प्राधिकरणातील अग्निशमन दल पथक दाखल, त्यानंतर शहरात पाच ठिकाणांचे पथके दाखल.५) सकाळी साडेसातला- गॅस कंपनीचे अधिकारी दाखल६) सकाळी नऊ- गॅस दुसºया वाहनात भरण्यास सुरूवात.७) सकाळी अकरा-२५ टक्के गॅस दुसºया वाहनात टाकण्यास सुरूवात. चार क्रेन मागविले.८) दुपारी १.१०-गॅस रिफीलींग बंद, टँकर उभा करण्याचे नियोजन सुरू.९) दुपारी ३.०४-चार क्रेनच्या माध्यमातून टँकर उभा केला. डद्बायव्हरच्या बाजूस सुरू अशाणारे लिकेंज थांबविले. त्यानंतर गॅस स्थलांतरीत केला. धोका टळला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघातnigdiनिगडी