निडणुक उरुळी कांचन, लोणी काळभोरची; सदस्य दनिवडणार दौंड तालुक्यातील मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:09+5:302020-12-08T04:11:09+5:30
लोणी काळभोर : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीमधील ११ पेेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका ...

निडणुक उरुळी कांचन, लोणी काळभोरची; सदस्य दनिवडणार दौंड तालुक्यातील मतदार
लोणी काळभोर : निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पुर्व हवेलीमधील ११ पेेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, मतदार यादीत दौंड तालुक्यातील विविध गावातील हजारो मतदारांची नावे घुसडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. निवडणुका पुर्व हवेलीमधील ग्रामपंचायतींच्या होणार असल्या तरी, ग्रामपंचायत सदस्य निवडीत प्राबल्य मात्र दौंड तालुक्यातील मतदारांचे राहणार आहे.
सत्तेच्या पटलावर ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच गटाचे प्राबल्य रहावे या उद्देशाने पुर्व हवेलीमधील काही वजणदार नेत्यांनी मतदार यादीत दौंड तालुक्यातील विविध गावातील हजारो मतदारांची नावे घुसडली आहे. दौंड तालुक्यातील भरतगाव व कासुर्डी या दोन गावातील चारशेहुन अधिक नागरीक एका रात्रीत लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या एका प्रभागाचे मतदार बनले आहेत. विशेष म्हणजे वरील सर्वच मतदारांचा लोणी काळभोरशी संबध नाही. हे मतदार वरील दोन्ही गावांच्या मतदार यादीत असल्याचेही तपासणीत पुढे आले आहे.
शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत काळभोर यांनी उरुळी कांचन, लोणी काळभोर, सोरतापवाडी सह पुर्व हवेलीमधील ११ पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या मतदार याद्या सदोष असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे. मतदार याद्या अंतीम करण्यापुर्वी प्रशासनाने संशयास्पद मतदाराच्या राहत असलेल्या घराची स्थळ पाहणी करण्यासोबत मतदार यादीत नाव सामाविष्ठ करण्यासाठी दिलेल्या कागदपत्राची सखोल चौकशी करण्याची मागणीही काळभोर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच, राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
पुर्व हवेलीमधील लोणी काळभोर सह उरुळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, थेऊर, आळंदी म्हातोबाची, वळती, शिंदवणे, भवरापुर, कोरेगाव मुळ, तरडे आदी ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने वरील सर्व ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या प्रसिध्द केल्या आहेत. याद्या प्रसिध्द होताच निवडणुक लढवणाऱ्या इच्छुकांनी याद्यांची पहाणी केली असता हवेली तालुक्याच्या सिमेवरील मात्र दौंड तालुक्यात असणाऱ्या प्रमुख गावातील हजारो नागरीकांची नावे उरुळी कांचन, लोणी काळभोर, सोरतापवाडी, कुंजीरवाडीसह वरील ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत आली असल्याचे लक्षात आले. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत ५०० पेक्षा जास्त नावे दौंड तालुक्यातीलच असल्याचे आढळुन आले आहे.
चौकट
हा प्रकार महसुल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन, दौंड तालुक्यातील हजारो हजारो मतदार हवेली तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत टाकल्याची लेखी तक्रार काळभोर यांनी जिल्हाधिकारी व हवेलीचे तहसिलदार यांच्याकडे केली आहे. मतदार यादीत घोळ असल्याचे पुराव्यासोबत लेखी तक्रार करुनही तहसिल कार्यालयाने अद्याप कसलीही कारवाई केलेली नाही. यामुळेच मुबंई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केलेली आहे. या याचिकेवर पुढील तीन ते चार दिवसात सुनावणी होणार आहे.
कोट
लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रसिध्द झालेल्या मतदार याद्यांची पहाणी करत असताना, लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या १ व ५ या प्रभागामध्ये सुमारे ५०० पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याची अधिक चौकशी केली असता हे सर्व मतदार दौंड तालुक्यातील भरतगाव व कासुर्डी या दोन गावातील असल्याचे निदर्शनास आले आहे. या गावांत जावून चौकशी केली असता त्यापैकी एकाचाही लोणी काळभोरशी दुरान्वये संबध नसल्याचे पुढे आले आहे. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत नव्याने नोंदलेल्या सर्वच मतदारांची नावे भरतगाव व कासुर्डी या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. लोणी काळभोर प्रमाणेच पुर्व हवेलीमधील अनेक गावात अशाच पद्दतीने मतदारांची बोगस नोंद झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.
- प्रशांत काळभोर, तक्रारदार
---
कोट
सुनिल कोळी ( तहसीलदार हवेली ) मतदार यादीत चुकीची नावे आल्याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. मात्र मतदार याद्यात बदल करण्याचा अधिकार नसल्याने सध्या आहे त्याच मतदार याद्या अंतीम राहणार आहेत. राज्य निवड़णुक आयोगाने वरील तक्रारीबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.