शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Pune | खेड-शिवापूरमध्ये NHAI ची अतिक्रमणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 16:14 IST

या ठिकाणच्या अतिक्रमणावर आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कारवाई केली...

खेड शिवापूर (पुणे) : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गच्या लगत संपादित जागांवरील अतिक्रमणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या सर्व अतिक्रमणामुळे सेवा रस्ते अनेक ठिकाणी अरुंद झाले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अनेक ठिकाणी टपरीवाले व छोटे दुकानदारांनी मुख्य रस्ता व सेवा रस्त्याच्या मध्ये आपली दुकाने लावून व्यवसाय थाटले होते. या ठिकाणच्या अतिक्रमणावर आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) कारवाई केली. 

या ठिकाणी रात्रीच्या सुमारास अनेक वाहने मुख्य रस्त्यावर लावली जात होती. अपघात होणे ही बाब नित्याचीच झाली होती. मुख्य रस्त्याबरोबरच सेवा रस्त्याच्या शेजारीच असलेले हॉटेल्सवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर ती सेवा रस्ता अडवला होता. आज (गुरुवारी) सकाळी अकराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने टोलनाक्यावर सेवा रस्त्यावरील संपादित जागेवरील अतिक्रमण पोकलेन, जेसीबीच्या साह्याने काढण्यास सुरुवात केली.

या कारवाईमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अंकित यादव उपव्यवस्थापक तांत्रिक विभाग भूसंपादन विभागाचे एल एल पाटील पोलीस प्रशास वतीने पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोज कुमार नवसरे यांच्याबरोबर वीस पोलिसांचा फौजफाटा होता. त्याचबरोबर महामार्ग पेट्रोलिंग पथक आपल्या दहा अभियंत्यांच्यासह बारा कर्मचारी, पोकलेन, 2 जेसीबी क्रेन व इतर लवाजम्यासह कारवाईत सहभागी झाले होता. साडे सदतीस मीटरपर्यंत जमीन संपादित केली होती. मात्र अचानकपणे आज हद्दीच्या खुणा ह्या पाच मीटर वाढवून साडे 42 मीटर पर्यंत करण्यात आले. याची जर पूर्व सूचना दिली असती आमचे नुकसान टाळता आले असते अशी प्रतिक्रिया स्थानिक हॉटेल व्यावसायिकाने दिली.

टॅग्स :PuneपुणेNHAIभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड