शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एनजीटी’तील विविध नियुक्त्यांना वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 03:20 IST

मेमध्ये प्रक्रिया पूर्ण; कालमर्यादा पाळण्याचे न्यायालयाचे आदेश

पुणे : न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्तीअभावी देशातील पाचही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे (एनजीटी) मागील सव्वा वर्षापासून मंद गतीने सुरु असणाऱ्या कामकाजाला आता वेग येणार आहे असून, ७ मेपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानुसार न्यायालयाने आदेश करीत केंद्र सरकारला कालमर्यादा पाळण्याचे आदेश दिले आहेत.एनजीटीच्या सर्व विभागीय खंडपीठामध्ये न्यायाधीशांची निवड होत नसल्याने पुणे एनजीटी बार असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला आहे. केंद्राने दिलेल्या शाश्वतीनुसार नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यास मे अखेरीस सर्व एनजीटीचे काम वेगाने सुरू होऊ शकते.एक अध्यक्ष, १० न्यायाधीश आणि १० तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यास मान्यता मिळाली आहे. तर सध्या ६ न्यायाधीश आणि ८ तज्ज्ञांची आवश्यकता आहे. त्याबाबतची जाहिरात १ मार्च रोजी काढण्यात आली आहे. २९ मार्चपर्यंत या जागांसाठी अर्ज करता येऊ शकतो. तर १५ एप्रिलपर्यंत अर्जांची तपासणी पूर्ण होईल.आवश्यक सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर एका आठवड्यात आदेश काढून नियुक्त्या होऊ शकतात, असे केंद्राने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांत नमूद आहे. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने निकालात नमूद केले आहे की, सध्या काही न्यायालयांचे कामकाज खूपच मंदावले असून त्याचा परिमाण खटल्यांवर होत आहे. त्यामुळे दोन्ही नियुक्त्या त्वरित होणे गरजेचे आहे. या बाबत ७ मे रोजी योग्य तो निकाल देण्यात येईल.कालमर्यादा निश्चितीचा होणार फायदायापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीश निवडीबाबत केंद्र सरकारकडूनच दिरंगाई होत असल्याची बाब समोर आली होती. नियुक्तीच्या दृष्टीने न्यायालयाने दिलेला हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यायालयाने कालमर्यादा निश्चित केल्याने मे अखेरीस नियुक्त्या होण्याची शक्यता आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सौरभ कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :environmentवातावरण