शहरं
Join us  
Trending Stories
1
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
2
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
3
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
4
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
5
प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
6
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
7
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
8
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
10
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना प्रवेश नाही; परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया
11
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या
12
चेन्नई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; इंडिगो विमानाच्या कॉकपीटच्या काचेला तडा, सर्व ७६ प्रवासी सुखरूप
13
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
14
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
15
IND vs WI : अंपायरनं विकेट किपरची चूक झाकली? RUN OUT झाल्यामुळं यशस्वी जैस्वालचं द्विशतक हुकलं (VIDEO)
16
नोबेल हुकले तरी ट्रम्प यांचा तोरा कायम; म्हणाले, “लाखो लोकांचे जीव वाचवल्याचा जास्त आनंद”
17
CM फडणवीसांकडून क्लीन चिट मिळताच योगेश कदमांनी मन मोकळे केले, भली मोठी पोस्ट लिहीत म्हणाले...
18
"माझा शारीरिक छळही झाला", घटस्फोटाबद्दल मयुरी वाघचा धक्कादायक खुलासा, म्हणाली- "ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच..."
19
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
20
सोने-चांदी नव्हे, या धातूने दिले सर्वाधिक रिटर्न; डोळे विस्फारतील, धक्का बसेल... पण खरे आहे... 

मंदावलेल्या एनजीटीच्या कामास हिरवा कंदील       

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 21:01 IST

साधारण मागील सव्वा वर्षांपासून ठप्प झालेल्या एनजीटीच्या कामांना सरकारकडून अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या जुलैपासून अनेक वर्ष प्रलंबित असलेले दावे निकाली लागणार आहेत

  पुणे : साधारण मागील सव्वा वर्षांपासून ठप्प झालेल्या एनजीटीच्या कामांना सरकारकडून अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या जुलैपासून अनेक वर्ष प्रलंबित असलेले दावे निकाली लागणार आहेत. न्यायाधीश व तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्तीच्या अभावी देशातील पाचही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) चे काम ठप्प झाले होते. मुलाखती झाल्यानंतर न्यायाधीश व तज्ञ सदस्यांच्या नियुक्ती देखील केल्या आहेत. सध्या काही न्यायालयांचे कामकाज  मंदावले असून त्याचा परिणाम खटल्यांवर होत आहे. त्यामुळे दोन्ही नियुक्त्या त्वरित होणे गरजेचे आहे. या बाबत ७ मे रोजी योग्य तो निकाल घेण्यात येईल. यापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीश निवडीबाबत केंद्र सरकारकडूनच दिरंगाई होत असल्याची बाब समोर आली होती.

आचारसंहिता संपल्यानंतर त्यांना रुजू होण्याबाबतच्या सूचना करण्यात येण्याची शक्यता आहे. ७ मेपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला मार्चमध्ये सांगितले होते. त्यानुसार न्यायालयाने आदेश करीत कालमर्यादा पाळण्याचे आदेशही दिले होते. मात्र आचार संहितेमुळे नियुक्ती रखडली असून ती मे अखेरीस होण्याची शक्यता आहे. परंतु एनजीटीला जूनमध्ये सुटी असते. त्यामुळे जुलैमध्ये नियमित कामकाज सुरू होणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिली. देशातील सर्व विभागीय खंडपीठामध्ये न्यायाधीशांची निवड न झाल्याने पुणे एनजीटी बार असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान केंद्राने ७ मेपर्यंत नियुक्ती करण्याची शाश्वती दिली होती. १ अध्यक्ष, १० न्यायाधीश आणि १० तज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यास मान्यता मिळाली आहे. तर सध्या ६ न्यायाधीश आणि ८ तज्ञांची आवश्यकता आहे. त्याबाबतची जाहिरात १ मार्च रोजी काढली होती.

टॅग्स :Courtन्यायालयPuneपुणे