पुढील दोन दिवस राहणार वाढते तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:14 IST2021-01-19T04:14:08+5:302021-01-19T04:14:08+5:30

पुणे : उत्तरेकडून येणारे वार्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने पुण्यासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. ...

The next two days will be rising temperatures | पुढील दोन दिवस राहणार वाढते तापमान

पुढील दोन दिवस राहणार वाढते तापमान

पुणे : उत्तरेकडून येणारे वार्यांपेक्षा सध्या दक्षिणेकडून उष्ण वारे उत्तरेकडे वाहत असल्याने पुण्यासह राज्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. अजून किमान दोन दिवस हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. राज्यात सोमवारी सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १०.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात प्रामुख्याने महाराष्ट्रात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात. त्यामुळे राज्यातील तापमानात घट होत असते. त्याप्रमाणे आताही उत्तरेकडील वारे दक्षिणेकडे येतील अशी अपेक्षा होती. परंतु, मध्य भारत आणि पश्चिम बंगालच्या परिसरात जास्ता दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे अजूनही दक्षिणेकडून वारे येत आहे. या वार्यांबरोबर पश्चिम बंगालच्या उपसागरावरुन येणारे बाष्पयुक्त वारेही असल्याने आपल्याकडे काही ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येत आहे. याचा परिणाम जानेवारीमध्येही सकाळी जाणवणारी थंडीही कमी झाली आहे. रात्री फॅन लावावा लागत आहे. अजून किमान दोन दिवस ही परिस्थती राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्यास आपल्याकडे थंडी परतण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्राती बहुतांश ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तर किमान तापमान १८ ते २० अंशावर गेल्याने गरम कपडे गुंडाळून ठेवण्याची स्थिती सध्या आली आहे. राज्यात सर्व ठिकाणी कमाल व किमान तापमान सरासरीच्या तुलनेत वाढलेले दिसून येत आहे. हवामानातील या बदलामुळे या हंगामात राज्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता धुसर झाली आहे.

पुण्यात आज कमाल तापमान ३२.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते २.९ अंशाने अधिक आहे. किमान तापमान १८.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली ते सरासरीच्या तुलनेत ७.१ अंशाने अधिक आहे. पुढील दोन दिवसात त्यात घट होण्याची शक्यता आहे. २१ जानेवारी रोजी ते सरासरीइतके राहण्याची शक्यता आहे.

Web Title: The next two days will be rising temperatures