शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंहगड’च्या प्रश्नाला बगल, सदस्यांच्या तीव्र भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 03:24 IST

सिंहगड शिक्षणसंस्थेतील प्राध्यापकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठाकडून ठोस काहीच कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले. याबाबत अधिसभा सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून प्रशासनाकडून याला बगल देण्यात आली.

पुणे : सिंहगड शिक्षणसंस्थेतील प्राध्यापकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यापीठाकडून ठोस काहीच कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले. याबाबत अधिसभा सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून प्रशासनाकडून याला बगल देण्यात आली.कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली अधिसभा शनिवारी पार पडली. यावेळी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सिंहगड एज्युकेशन इन्टिट्यूटमध्ये प्राध्यापकांचे १६ महिन्यांपासून वेतन न झाल्याने निर्माण झालेला प्रश्न योग्य प्रकारे न हाताळण्यात आल्याने अधिसभा सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरले. शेतकऱ्यांप्रमाणे तिथल्या प्राध्यापकांवरही आता आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याच्या तीव्र भावना यावेळी मांडण्यात आल्यावर अधिसभा सदस्यडॉ. पंकज मिनियार यांनी सभागृहात याबाबचा प्रश्न विचारला. डॉ. बाळासाहेब आगरकर यांनीही त्या प्रश्नाची तीव्रता स्पष्ट केली. मात्र इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्यसंजय चाकणे यांनी हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचा मुद्दा मांडला. त्यानंतर कुलगुरूंनी हाच मुद्दा पकडून हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत जास्त बोलता येणार नसल्याचे स्पष्ट केले.सिंहगडवर एआयसीटीईने प्रवेशबंदीची कारवाई केली. त्यांची दिल्लीची समिती पुण्यात येऊन चौकशी करून गेली. मात्र पुणे विद्यापीठ मात्र इथेच असून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर यांनी विद्यार्थी संख्येच्या तुलनेत विद्यापीठाचे वसतिगृह अपुरे पडत असल्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. विद्यार्थी संख्या लक्षात घेता नवीन वसतिगृहांची उभारणी करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी अधिसभा सदस्यांकडून व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :sinhagad instituteसिंहगड इन्स्टिट्युटPuneपुणे