शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पुढचा गळीत हंगाम अडचणीचा, आगामी गळीत कार्यक्रमाची आखणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 05:10 IST

पुणे : राज्यासह देशात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने, पुढील वर्षी विक्रमी ऊस उत्पादन होऊन गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पुणे : राज्यासह देशात उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने, पुढील वर्षी विक्रमी ऊस उत्पादन होऊन गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक असून, पुढील गळीत कार्यक्रमाची आखणी करावी, अशी सूचना माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली.मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) ४१व्या विशेष सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, कलाप्पा आवाडे, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव नागवडे या वेळी उपस्थित होते.पवार म्हणाले, देशात सर्वच ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढले असल्याने, काळजी करण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका पुढील गळीत हंगामाला होईल. त्यामुळे आत्तापासूनच पुढच्या गळीत हंगामाची तयारी करावी. कदाचित पुढील हंगामात कारखाने लवकर सुरू करावे लागतील. तसे न केल्यास कारखाने जूनपर्यंत चालू ठेवावे लागतील. परिणामी, साखरेच्या उताºयात घट होईल. त्यामुळे ऊस उत्पादकांना उसाची योग्य किंमत देताना कारखान्यांना कसरत करावी लागेल.उसाचे उत्पादन वाढल्यास इथेनॉल करण्याची शिफारस अनेकांनी केली आहे. ब्राझिलसारख्या देशात थेट उसाच्या रसापासून इथेनॉल तयार केला जातो. ती पद्धत भारतासाठी सध्या अनुकुल नाही. ही पद्धत अधिक खर्चिक असल्याचे प्रयोगावरुन लक्षात आले आहे. त्यामुळे कारखान्यांनी मोलॅसिस साठवून, पुढे त्याचा वापर इथेनॉलसाठी करावा. त्याचबरोबर खर्चात काटकसर करावी, साखरेच्या उत्पादनखर्चात कपात कशी होईल याचे नियोजन केले पाहिजे, असे पवार या वेळी म्हणाले.साखर कारखानदारी अडचणीत असताना या पूर्वी राज्यासह केंद्र सरकारने देखील मदतीची भूमिका घेतली आहे. सध्याच्या सरकारची तशी भूमिका असल्याचे वाटत नाही. साखर कारखानदारी हा व्यवसाय असून, त्यातील तोटा आणि नफा हा त्या उद्योगांनी पाहावा, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊनच अपल्याला उद्योगाचे नियोजन करावे लागेल. पुढील हंगामात ज्या ठिकाणी ऊस तुलनेने कमी असेल, त्यांनी जास्तीचा ऊस असणाºया भागातील उत्पादकांशी करार करावेत, असा सल्लाही पवार यांनी दिला.>ऊस आणि साखर उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ आणि विविध साखर कारखान्यांना वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंगळवारी (ता.२६) संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी राज्यातील सर्वाेत्कृष्ट कै. वसंतदादा पाटील सोनहिरा (वांगी, ता.कडेगाव, जि. सांगली) या कारखान्याला प्रदान करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवार