शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

येत्या १० दिवसात सारथीचे सर्व प्रश्न सोडवणार :विजय वडेट्टीवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 19:06 IST

विद्यावेतन मिळत नसल्यामुळे लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी नुकतेच दिल्ली येथे जंतर- मंतरवर आंदोलन केले होते. तसेच सारथीच्या माध्यमातून दिले जाणारे थकित विद्यावेतन तात्काळ मिळावे,अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रथमच सारथी संस्थेला भेट देवून संस्थेतील कामाची माहिती घेतली.

पुणे: सारथीच्या स्वायत्ततेबाबत पुढील आठवड्यात होणा-या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठक चर्चा केली जाईल.त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या प्रलंबित निधीसह इतर प्रश्न येत्या दहा दिवसात सोडविले जातील, अशी माहिती बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी सांगितले. तसेच पुढील काळात मराठा-कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून नोक-या उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न केले जातील,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विद्यावेतन मिळत नसल्यामुळे लोकसेवा आयोगाची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी नुकतेच दिल्ली येथे जंतर- मंतरवर आंदोलन केले होते. तसेच सारथीच्या माध्यमातून दिले जाणारे थकित विद्यावेतन तात्काळ मिळावे,अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रथमच सारथी संस्थेला भेट देवून संस्थेतील कामाची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार बोलत होते. 

ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाची रक्कम थकली होती.त्यामुळे दिल्लीतील विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, दोन दिवसातच दिल्लीतील सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडविण्यात आला.सारथी संस्थेच्या स्थापनेचा उद्देश पूर्ण झाला पाहिजे.आता सारथीच्या कामाचा आढावा मंत्री म्हणून मी स्वत: दर महिन्याला घेणार आहे. त्याचप्रमाणे दर तीन महिन्यांनी सारथीच्या कामाचा अहवाल उपसमितीसमोर ठेवला जाईल. त्यामुळे या संस्थेच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना होतो किंवा नाही. हे तपासले जाईल.वडेट्टीवार म्हणाले, सारथीच्या माध्यमातून राबविल्या जाणा-या योजना व उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.तसेच त्यात सुधारणा करण्याबाबत अधिका-यांशी चर्चा करण्यात आली. सारथी संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला किंवा नाही. याबाबत अधिका-यांकडून तपास केला जात आहे.तपासणीनंतरच यावर भाष्य करता येईल,असे नमूद करून वडेट्टीवारम्हणाले,महाविद्यालयांमधील शिष्यवृत्ती वितरणात झालेल्या गौरव्यवहाराची चौकशी सुरू असून त्यात दोषी असणा-यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.  

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षणEducationशिक्षण