तलवारीच्या धाकाने वृत्तपत्र विक्रेत्याला लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:12 AM2021-03-05T04:12:55+5:302021-03-05T04:12:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वृत्तपत्र विक्री करणाऱ्या विक्रेता व इतरांना चाकू व तलवारीचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी ९० ...

The newspaper vendor was robbed by a sword | तलवारीच्या धाकाने वृत्तपत्र विक्रेत्याला लुबाडले

तलवारीच्या धाकाने वृत्तपत्र विक्रेत्याला लुबाडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वृत्तपत्र विक्री करणाऱ्या विक्रेता व इतरांना चाकू व तलवारीचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी ९० हजार ३०० रुपयांची शबनम जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना लक्ष्मी नारायण चित्रपटगृहासमाेरील उड्डाण पुलाखाली गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी शंकर अण्णा खुटवड (वय ५०, रा. चैतन्यनगर, धनकवडी) यांनी दत्तवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन सोंडकर ऊर्फ घाऱ्यासह तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

शंकर खुटवड हे वृत्तपत्र विक्रेते आहेत. लक्ष्मी नारायण समोरील उड्डाण पुलाखाली ते वृत्तपत्र विक्री करत थांबले होते. बँकेत भरण्यासाठी त्यांनी शबनम बॅगमध्ये ९० हजार ३०० रुपये ठेवले होते. यावेळी तिघे जण दुचाकीवरुन आले. त्यांच्यातील मागे बसलेल्याने त्यांच्याकडील शबनम बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन तो दुचाकीकडे पळाला असता त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी त्यांच्याकडे पेपर घेण्यासाठी आलेले प्रीतम पिंपळे यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडली. त्यावेळी बॅग पळविणाऱ्याने खुटवड यांना फायटरने मारले व तो पळून जाऊ लागला. तेव्हा पिंपळे यांनी धरून ठेवण्याचा प्रयत्न केला. चोरट्याने चाकू काढून पिंपळे यांच्यावर उगारला. त्यामुळे त्यांची पकड सैल झाल्याने त्याने जर्कीन व टी-शर्ट काढून तेथून पळून गेला. त्याचवेळी तेथील प्रीतम चिलेव्हरी यांच्यावर तिसऱ्या चोरट्याने तलवार उगारून घाबरवले व तेथून तो पळून गेला. तेथे पडलेली दुचाकी सचिन सोंडकर पळविण्याचा प्रयत्न केला.

खुटवड हे सचिन सोंडकर याला ओळखतात. खुटवड यांच्याकडे रोज जास्त पैसे असल्याची माहिती सोंडकर याला होती. त्यातूनच त्याने खुटवड यांना बोलण्यात गुंतवून लुबाडण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक आर. पवार, एस. लोहार यांनी घटनास्थळाला भेट दिली. दत्तवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: The newspaper vendor was robbed by a sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.