शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहित जोडप्यांना आता थेट मिळणार खंडोबाचे दर्शन, जेजुरी देवस्थानचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:06 IST

विवाहानंतर कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाला येणाऱ्या नववधू-वराला आता थेट मंदिरात प्रवेश देऊन देवदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवसंस्थान विश्वस्त व व्यवस्थापनाने घेतला आहे.

ठळक मुद्देशनिवार (दि. २०) पासून या उपक्रमाला सुरुवात, नव वधू-वर दाम्पत्यांकडून याचे स्वागतया सुविधेसाठी पुढील आठवड्यापासून महिला कर्मचाऱ्यांची करण्यात येणार नियुक्ती

जेजुरी : विवाहानंतर कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनाला येणाऱ्या नववधू-वराला आता थेट मंदिरात प्रवेश देऊन देवदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय देवसंस्थान विश्वस्त व व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच नव वधूची खणा-नारळाने ओटीही भरण्यात येणार आहे.  ही सुविधा फक्त नव वधू-वरांसाठी करण्यात येत असून, त्यांच्यासमवेत येणाऱ्या नातलगांना दर्शनरांगेचा वापर करावा लागणार आहे, शनिवार (दि. २०) पासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून, याबाबत नव वधू-वर दाम्पत्यांकडून याचे स्वागत करण्यात आले आहे.जेजुरी हे महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे लोकदैवत समजले जाते. कुटुंबातील मुलाचा किंवा मुलीचा विवाह ठरल्यानंतर राज्याच्या विविध प्रांतातील भाविक येथे दाखल होऊन खंडेरायाची पूजा -अभिषेक करीत मोठ्या श्रद्धेने लग्नपत्रिका देवाला अर्पण करतात. नंतरच नातलगांना पत्रिका वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. ही परंपरा आजही कायम आहे. यामुळे येथून पुढे देवाला अर्पण झालेल्या पत्रिकेतील वधू-वरांच्या माता-पित्यांना देवसंस्थानच्या वतीने शुभेच्छा संदेश पाठविण्यात येणार आहेत. विवाहानंतर संसारिक जीवनाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या नव वधू-वर परिवारासह जेजुरीला येतात.  वराकडून वधूला कडेवर उचलून घेत गडकोटाच्या किमान पाच पायऱ्या चढून मंदिरात जाऊन कुलदैवताचे दर्शन घेतात. तळीभंडार, जागरण - गोंधळ आदी धार्मिक विधीही करतात. गेली शेकडो वर्षांची ही परंपरा आहे, मात्र सध्या जत्रा-यात्रा उत्सवांच्या काळात विवाहाच्या पोशाखात आणि कपाळी मुंडावळ्या असलेल्या नवविवाहित दामपत्यास रांगेत उभे राहावे लागते, नववधू-वरांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांना तत्काळ मंदिरात दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे. गडकोट आवारातील कार्यालयात नवविवाहित वधू-वरांची रजिस्टरला नोंद घेऊन त्यांना व्यवस्थापनातील कर्मचारी मुख्य मंदिरात घेऊन जात दर्शन घडवणार आहेत. मात्र, त्यांच्याबरोबर असलेल्या नातलगांना दर्शनरांगेतूनच मंदिर प्रवेश  दिला जाणार आहे. त्यानंतर पुन्हा कार्यालयात आणून नववधूची खणा-नारळाने ओटी भरण्यात येईले. या सुविधेसाठी पुढील आठवड्यापासून महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. देवांना अर्पण केलेल्या लग्नपत्रिकांनाही येथून पुढे शुभेच्छांचे संदेश पाठविण्यात येणार आहेत. देवसंस्थांकडून या उपक्रमास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपासून सुरू केलेल्या उपक्रमाबाबत भाविकांनी स्वागत केले़.

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणे