बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:09 IST2021-01-09T04:09:12+5:302021-01-09T04:09:12+5:30

पुणे: कल्पना एज्युकेशन सोसायटी व युनिव्हर्सल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज यांच्या वतीने महिलांचे सबलीकरण होण्याच्या दृष्टीने चॉकलेट मेकिंग कार्यशाळेचे आयोजन ...

News | बातम्या

बातम्या

पुणे: कल्पना एज्युकेशन सोसायटी व युनिव्हर्सल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज यांच्या वतीने महिलांचे सबलीकरण होण्याच्या दृष्टीने चॉकलेट मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला ४२ महिलांनी प्रतिसाद दिला. या वेळी चंद्रकांत धुपकर, आर. वाय. पाटील आदी उपस्थित होते.

राज्यस्तरीय गडकिल्ले बांधणी स्पर्धेत १० हजारांहून अधिक स्पर्धक

पुणे : सृजनतर्फे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यस्तरीय गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदा स्पर्धेत ३०० मित्रमंडळ आणि १० हजार स्पर्धक सहभागी झाले होते.

राज्यभरात ३० जिल्ह्यांमधून स्पर्धा पार पडली. स्पर्धकांनी गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आयोजकांपर्यंत पोहोचवल्या.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह येथे पार पडला. विजेत्या स्पर्धकांना लेखक रामनाथ आंबेरकर यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या वेळी आमदार रोहित पवार उपस्थित होते.

Web Title: News