बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:26 IST2021-01-08T04:26:11+5:302021-01-08T04:26:11+5:30

पुणे : पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत घेतलेल्या शालेय निबंध स्पर्धेत वारजे कर्वेनगर विभागातून नेमन ...

News | बातम्या

बातम्या

पुणे : पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत घेतलेल्या शालेय निबंध स्पर्धेत वारजे कर्वेनगर विभागातून नेमन सोनार (इयत्ता सहावी, कै वनाबाई बाळोबा बराटे शाळा) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत शिवछत्रपती सभागृहात स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. उपमहापौर सरस्वती शेंडगे, शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी, वर्गशिक्षिका मधुरा राजोपाध्ये आदी यावेळी उपस्थित होते.

---------------

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पुणे : महात्मा फुले मंडळाच्या वतीने केशवनाथ पथकाच्या शंखनाद पद्धतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत आणि मंडळाचे सभासद उपस्थित होते.

यशवंत फिल्मस प्रॉडक्शनतर्फे फुले जयंती साजरी

पुणे: यशवंत फिल्मसचे निर्माता संजय गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ जयंत जोशी, दिग्दर्शक प्रशांत सुर्वे, बलवंत माने, अंकिता ढमढेरे, विजय गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.