निर्वी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य अशोक तरटे यांचे अपघाती निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:43+5:302021-02-05T05:03:43+5:30
अशोक तरटे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत काही कामानिमित्त कराडला (जि. सातारा) गेले होते. काल (दि.२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कराड ...

निर्वी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य अशोक तरटे यांचे अपघाती निधन
अशोक तरटे हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत काही कामानिमित्त कराडला (जि. सातारा) गेले होते. काल (दि.२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कराड कडेगाव रस्त्याने ते पायी चालत असताना दुचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले .त्यानंतर त्यांना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज पहाटे पाचच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नुकत्याच झालेल्या निर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत ते निवडून आले होते. तसेच त्यांनी यापूर्वी निर्वी ग्रामपंचायतीचे सदस्य व सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले होते. येत्या ९ तारखेला होणाऱ्या निर्वी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी ते सरपंच पदाचे प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र त्या अगोदरच त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच निर्वी-न्हावरे परिसरात शोककळा पसरली. आज (दि.३) सायंकाळी साडेचार वाजता शोकाकुल वातावरणात निर्वी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.