शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नवोदित अभिनेत्रीचा पुण्यात भररस्त्यात गोंधळ, महिला पोलिसाच्या बोटाला चावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 16:05 IST

वडगाव शेरीतील घटना; हाॅटेलचालकाशी वाद...

पुणे : हाॅटेलचालकाशी वाद झाल्याने भरस्त्यात नवोदित अभिनेत्रीने गोंधळ घातल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. तिला समजावून सांगणाऱ्या महिला पोलिसाच्या बोटाला चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणणे तसेच महिला पोलिसाच्या बोटाला चावा घेतल्या प्रकरणी नवोदित अभिनेत्रीला अटक करण्यात आली.

ही २८ वर्षाची नवोदित अभिनेत्री मुळची बंगळुरु येथील राहणारी असून सध्या अंधेरी येथे राहते. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदारांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी तरुणी अभिनेत्री असून तिने काही वेबसिरीजमध्ये छोट्या भूमिका केली आहे. ती कामाच्या शोधात असून ती पुण्यात कामानिमित्त आली होती. तिने वडगाव शेरी परिसरातील एक हाॅटेलमधील खोली ऑनलाइन आरक्षित केली होती. खोली सुविधा तिला आवडल्या नाहीत. त्यामुळे तिने पैसे परत मागितले.

या कारणावरुन तिने हाॅटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती हाॅटेल व्यवस्थापनाने पोलिसांना दिली. महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या दामिनी पथकातील महिला पोलीस तेथे गेल्या. त्यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. हाॅटेलसमोरील रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या या अभिनेत्रीला महिला पोलिसांनी गाडीत बसण्यास सांगितले. त्या वेळी दामिनी पथकातील महिला पोलीस मार्शलशी वाद घालून झटापट केली. तिने या महिला पोलिसांच्या बोटाचा चावा घेतला. सरकारी कामात आणणे तसेच दुखापत केल्या प्रकरणी तिला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मुळुक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड