शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्याातील नवीन मतदारांना लवकरच मिळणार घरपोच रंगीत ओळखपत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 12:43 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील स्थिती : २ लाख ८८८ नव मतदारांनी नोंदणी शासनाकडून व विविध स्वयंसेवी संस्थांकडून निवडणूकीबाबत जागृतीयेत्या आठवड्याभरात मतदार ओळखपत्रांचे वाटप सुरू

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंत तब्बल २ लाख ८८८ नवीन मतदारांनी नोंदणी केली असून या सर्व मतदारांना लवकरच रंगीत ओळखपत्राचे वितरण करण्यात येणार आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देशातील सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही अधिक भक्कम करणे गरजेचे आहे. शासनाकडून व विविध स्वयंसेवी संस्थांकडून निवडणूकीबाबत जागृती करण्यात आली. त्यामुळे दिवसेंदिवस नव मतदारांच्या संख्येत वाढ होत आहे. पुणे जिल्ह्यात नव मतदारांची संख्या दोन लाखाहून अधिक झाली आहे. या नव मतदारांचे स्मार्ट रंगीत ओळखपत्र नुकतेच जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकाऱ्यांकडे (बीएलओ) ओळखपत्र दिले जातील, असेही मोनिका सिंह म्हणाल्या.मतदार यादी प्रसिध्द झाली असली तरी सर्वच मतदारांकडे मतदार ओळखपत्र नाही.काही मतदारांना या पूर्वी झालेल्या मतदार नोंदणीनंतर ओळखपत्रच देण्यात आली नाहीत.त्यामुळे या लोकसभा निवडणूक काळात तरी ओळखपत्र मिळणार का? असा प्रश्न अनेक मतदारांकडून उपस्थित केला जात आहे. परंतु, जुन्या मतदारांना ओळखपत्रांचे वितरण केले जाणार नाही.तर केवळ नवमतदारांनाच ओळखपत्र देण्यात येणार आहे. येत्या आठवड्याभरात मतदार ओळखपत्रांचे वाटप सुरू होईल.परंतु,घरपोच मतदार ओळखपत्र मिळाले नाही अशा मतदारांनी मतदान नोंदणी केंद्रावर जावून स्वत: ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असेही आवाहन मोनिका सिंह यांनी केले आहे. 

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानElectionनिवडणूकLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक