इंदापूरमध्ये येणाऱ्या काळात नवनवीन स्टार्टअप : अंकिता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:09 IST2021-01-09T04:09:03+5:302021-01-09T04:09:03+5:30

पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची गुरुवारी (दि. ...

New startups coming to Indapur: Ankita Patil | इंदापूरमध्ये येणाऱ्या काळात नवनवीन स्टार्टअप : अंकिता पाटील

इंदापूरमध्ये येणाऱ्या काळात नवनवीन स्टार्टअप : अंकिता पाटील

पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील यांनी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची गुरुवारी (दि. ७) मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. याबाबत इंदापूर येथे पत्रकारांना माहिती दिली.

अंकिता पाटील म्हणाल्या की, खासदार प्रियंका चतुर्वेदी या एक कणखर युवा महिला राजकारणी म्हणून परिचित आहेतच. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्या दोन स्वयंसेवी संस्थांच्या विश्वस्त आहेत, त्यांनी विविध स्टार्टअपद्वारे युवा आणि महिला सक्षमीकरणासाठी मोठे कार्य केले आहे. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यातील युवक-युवतींना व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

०८ इंदापूर

प्रियंका चतुर्वेदी यांच्याशी चर्चा करताना अंकिता पाटील.

Web Title: New startups coming to Indapur: Ankita Patil