कोव्हीडं रूग्णांसाठी नवी समस्या! ‘म्युकरमायकोसीस' आजाराची भर, वेळेवर उपचार न घेतल्यास अंधत्व येण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 06:17 PM2021-05-02T18:17:59+5:302021-05-02T18:18:49+5:30

लक्षण दिसताच उपचार घेण्याचा नेत्ररोगतज्ञांचा सल्ला

New problem for Kovidam patients! Addition of ‘myocardial infarction’ disease, fear of blindness if not treated in time | कोव्हीडं रूग्णांसाठी नवी समस्या! ‘म्युकरमायकोसीस' आजाराची भर, वेळेवर उपचार न घेतल्यास अंधत्व येण्याची भीती

कोव्हीडं रूग्णांसाठी नवी समस्या! ‘म्युकरमायकोसीस' आजाराची भर, वेळेवर उपचार न घेतल्यास अंधत्व येण्याची भीती

googlenewsNext
ठळक मुद्देम्युकरमायकोसीस मानवामधील बुरशीजन्य संक्रमणाचा एक प्राणघातक आजार

बारामती: कोविड -१९ मधून बरे झालेले अनेक रूग्ण वेगवेगळ्या पोस्ट कोविड समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. त्यामध्ये आता  ‘म्युकरमायकोसीस’ या आजाराची भर पडली आहे. हा एक गंभीर आजार असून दुर्मिळ बुरशीजन्य संसर्ग जो म्यूकोर्मिसाइट्स नावाच्या मोल्डच्या एका प्रजाती मुळे होतो. या आजारवर वेळीच उपचार न घेतल्यास अंधत्व येण्याची भीती नेत्ररोग तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोरोनात खोकला, पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डीसऑर्डर (पीटीएसडी), तणाव, भरलेली छाती, उदासीनता, झोपेचा अभाव, चिंता, सांधेदुखी, थकवा, श्वासोच्छ्वास आणि न्यूरोलॉजिकल समस्या, छातीत दुखणे, इत्यादी त्रास रुग्णांना जाणवतो. यामध्ये आता  ‘म्युकरमायकोसीस’ ची भर पडली आहे. 

बारामती येथील डॉ हर्षल राठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, अलीकडे, कोविड - १९ संसगार्पासून बरे झालेले अनेक रूग्ण म्युकरमायकोसीस संसगार्ची लक्षणे घेऊन रुग्णालयात येत आहेत. गंभीर कोरोनाच्या रुग्णांचे सिस्टीमिक स्टिरॉइड्स द्वारे उपचार केले जातात. अशा रूग्णांमध्ये संधीपूर्ण बुरशीजन्य संसर्ग चिंताजनक आहे.  ही बुरशी मातीमध्ये आणि सडलेल्या सेंद्रिय पदार्थांवर वाढते. ही बुरशी श्वासोच्छवासाद्वारे शरीरात प्रवेश करू शकते.  तसेच त्वचेत जखमेच्या माध्यमातून प्रवेश मिळवू शकते. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला डॉ.राठी यांनी दिला आहे.
 चेहऱ्यावर सूज, नाकातून रक्तरंजित स्त्राव, डोळा आणि नाकाजवळची त्वचा काळी पडणे, अचानक दृष्टी कमी होणे, रूग्णाची सामान्य स्थितीत द्रुत बिघाड. हे नाकापासून डोळ्यापर्यंत आणि मेंदूत वेगाने पसरते. एकदा मेंदूत त्याचा प्रसार झाला तर ते खूप गंभीर मानले जाते. विशेषत: वृद्ध व्यक्तीस, मधुमेह, उच्चरक्तदाब, थायरॉईड विकार, मूत्रपिंडासंबंधी समस्या, असे विकार असणाऱ्या लोकांना हा आजार उद्भवण्याची शक्यता जास्त असते.

उपचार कसा केला जाऊ शकतो?

म्युकरमायकोसीस मानवामधील बुरशीजन्य संक्रमणाचा एक प्राणघातक आजार आहे. त्यासाठी अँफोटेरीसिन बी नावाची अँटी फंगल औषध देखील काही आठवड्यांसाठी दिले जाते. रोगाचा संसर्ग जास्त असल्यास इंजेक्शनद्वारे उपचार केले जातात. आजार टाळण्यासाठी काही बुरशीजन्य बीजकोश ओलसर भागात, धूळात, मातीने बंद असलेल्या डिंगी-नसलेल्या खोल्या इत्यादींमध्ये असतात. म्हणून अशी क्षेत्रे टाळणे, मास्क घालणे, नियमितपणे हात धुणे, नाक किंवा डोळ्यांना स्पर्श न करण्याचा सल्ला देखील डॉ.राठी यांनी दिला आहे. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये वरीलपैकी कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे दिसल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. जितक्या लवकर उपचार घ्याल तितके या प्राणघातक आजारापासून वाचण्याची शक्यता वाढेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

Web Title: New problem for Kovidam patients! Addition of ‘myocardial infarction’ disease, fear of blindness if not treated in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.