शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

नवी वनस्पती : वणव्यात होरपळूनही ‘ती’ पुन्हा बहरते, फुलते! संशोधकांना आढळले निसर्गातील आश्चर्यच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 07:21 IST

फुलण्यासाठी आगच वरदान, त्यातून हाेताे बीजप्रसार...

पुणे : वणवा लागला की, सर्व काही जळून जाते; पण शिल्लक राहिलेल्या राखेतूनही पुन्हा फुलणारी अनोखी वनस्पती तळेगाव दाभाडेजवळच्या गवताळ कुरणांमध्ये आढळली आहे. ‘डिक्लीपटेरा पॉलीमॉर्फा’ असे तिचे शास्त्रीय नाव आहे. तळेगावस्थित वनस्पती अभ्यासक आदित्य धारप आणि पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेमधील डॉ. मंदार दातार, भूषण शिगवण यांनी ही वनस्पती शोधली आहे. यावरचा रिसर्च पेपर इंग्लंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘क्यू बुलेटिन’ नावाच्या संशोधन नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला. 

फुलण्यासाठी आगच वरदान, त्यातून हाेताे बीजप्रसार- ‘डिक्लीपटेरा पॉलीमॉर्फा’ ही वनस्पती आगीशी सामना करून जिवंत राहणाऱ्या काही निवडक वनस्पतींपैकी आहे. इंग्रजीत या वैशिष्ट्याला ‘पायरोफायटिक’ असे म्हणतात. - आफ्रिकेच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या गवताळ प्रदेशात आगीनंतर फुलोऱ्यावर येणाऱ्या अनेक वनस्पती आढळतात. मात्र, भारतात नाही. - ‘पायरोफायटिक’ प्रकारातल्या या वनस्पती फुलण्यासाठी किंवा बीजप्रसारासाठी पूर्णपणे आगीवर अवलंबून असतात. - मात्र ‘डिक्लीपटेरा’ फुलण्यासाठी आगीनंतरच्या परिस्थितीचा स्वतःसाठी फायदा करून घेते.

भारतात आढळणाऱ्या ‘डिक्लीपटेरा’च्या कुठल्याच प्रजातीत अशा प्रकारचे दोनदा फुलणे नोंदले गेलेले नाही. मात्र, आफ्रिकेतल्या काही ‘डिक्लीपटेरा’च्या दोन-तीन जाती मात्र आगीनंतर फुलतात. त्यांच्याशी नाते सांगणारी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती ठरते.- मंदार दातार, ज्येष्ठ संशोधक, आघारकर संशोधन संस्था.

लंडनच्या क्यू बॉटॅनिक गार्डन, येथील वनस्पती तज्ज्ञ डॉ. आयेन डर्बिशायर यांनीही या वनस्पतीच्या नवेपणाला दुजोरा दिला.

टॅग्स :Plantsइनडोअर प्लाण्ट्सforestजंगल