मराठा महामोर्चाचे नवे कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:07 IST2017-08-04T03:07:42+5:302017-08-04T03:07:42+5:30

मुंबईत निघणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या तयारीसाठी हडपसर सकल मराठा समाजाची व्यापक बैठक बुधवारी (दि. २) हडपसर उपनगरातील पुणे-सोलापूर रस्त्यावरील रविदर्शन बिल्डिंग गाडीतळ या ठिकाणी झाली.

 New office of Maratha Mahamopar | मराठा महामोर्चाचे नवे कार्यालय

मराठा महामोर्चाचे नवे कार्यालय

हडपसर : मुंबईत निघणाºया मराठा क्रांती मूक मोर्चाच्या तयारीसाठी हडपसर सकल मराठा समाजाची व्यापक बैठक बुधवारी (दि. २) हडपसर उपनगरातील पुणे-सोलापूर रस्त्यावरील रविदर्शन बिल्डिंग गाडीतळ या ठिकाणी झाली. तसेच मराठा महामोर्चा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईत दि. ९ रोजी क्रांतीदिनी महा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरात तयारीसाठी बैठका घेतल्या जात आहेत. पुण्यामध्ये यापूर्वी तीन बैठका झाल्या आहेत. आता तालुकास्तरावर आणि गावोगावी बैठका सुरू झाल्या असून, जनजागृती करण्यात येत आहे. आता अंतिम तयारीला वेग देण्यासाठी हडपसर या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या बैठकीला मराठा समाजातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शासकीय, अशासकीय कर्मचारी, विविध संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे सोशल मीडियासह प्रत्यक्षात भेटी घेऊन
मोर्चाविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

Web Title:  New office of Maratha Mahamopar