शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण आजच्या काळाची गरज : महेश काळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 19:16 IST

अभिजात संगीत पुढे न्यायचे असेल तर सातत्याने अधिकाधिक प्रयोग होणे गरजेचे

ठळक मुद्देपत्रकार परिषद : 'इनफ्युजन' ही एक नवीन संकल्पना ते श्रोत्यांपुढे

पुणे : आजच्या काळात वृत्तवाहिन्यांची संख्या वाढली आहे. कार्यक्रमांमध्येही विविध वाद्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीताचा पडदाही आता मोठा झाला पाहिजे. अभिजात संगीत पुढे न्यायचे असेल तर सातत्याने अधिकाधिक प्रयोग होणे गरजेचे आहे. संगीताचे नव्या पद्धतीने सादरीकरण करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध युवा गायक महेश काळे यांनी व्यक्त केले. शास्त्रीय संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महेश काळे 'इनफ्युजन' ही एक नवीन संकल्पना ते श्रोत्यांपुढे आणत आहेत. यानिमित्त गुरूवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  या संकल्पनेचे सादरीकरण सर्व प्रथम एनसीपीए ,मुंबई व त्यानंतर गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे अनुक्रमे येत्या दि. १ व २ फेब्रुवारी रोजी होणार आहे.    शास्त्रीय संगीत हे केवळ विशिष्ट गटासाठीच असते, हा समज आपल्या अनेक चित्रपटांच्या संगीताला मिळणा-या लोकप्रियतेने मोडून काढला आहे. याचे कारण चित्रपट गीतांमधून वेगळ्या पद्धतीने त्याचे झालेले सादरीकरण. जर आपल्याला तरुण पिढीत शास्त्रीय संगीत रुजवायचे असेल तर त्यात सातत्याने प्रयोग व्हायला हवेत असे सांगून महेश काळे म्हणाले, ’कटयार काळजात घुसली’ या चित्रपटानंतर श्रोत्यांची एक वेगळीच लाट समोर आली. ज्यात ज्येष्ठांपेक्षा तरुण रसिकांची संख्या जास्त होती. हे मला टिकवायचे आहे. या तरुणांनी शास्त्रीय संगीतात अधिकाधिक रस घ्यावा म्हणून काय करता येईल हा विचार सुरु झाला आणि मी काही प्रयोग करू लागलो. चित्रपटातील शास्त्रीय रागांवर आधारित प्रसिध्द गीते घेऊन त्यांची सरगम, सोपी मांडणी आणि सौंदर्य आकर्षकरीत्या मांडण्याचा प्रयत्न यामधून सुरु झाला. त्यासाठी मोठा वाद्यवृंद संगतीला आला. हा प्रयोग लोकांना फार आवडत आहे, हे लक्षात आल्यावर त्यावर अधिक विचार करून ही ‘इनफ्युजन’ संकल्पना घेऊन आता लोकांपर्यंत येत आहे.     जुन्या पिढीतील जाणकारांची अपेक्षापूर्ती करत असतानाच नव्या दमाच्या तरुण पिढीचे शास्त्रीय संगीताप्रती असलेले कुतूहल टिकविणे हेदेखील महत्वाचे आहे. हा कार्यक्रम नेमके याच दोन्ही गोष्टी साध्य करण्याचा एक प्रयत्न आहे. या कार्यक्रमाचा गाभा हा शास्त्रीय संगीताचाच असणार आहे. यासाठी वाजणारा वाद्यवृंद हा हिंदुस्तानी व पाश्चात्य वाद्यांचा असेल. नवा साज लेवून आकर्षक पद्धतीने शास्त्रीय संगीत तरुणांना भावेल अशा स्वरुपात ते रसिकांसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :PuneपुणेMahesh Kaleमहेश काळेmusicसंगीत