आंबळेत नवविवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: July 5, 2017 02:43 IST2017-07-05T02:43:51+5:302017-07-05T02:43:51+5:30

आंबळे (ता.शिरुर) येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पूजा सचिन कौठाळे (वय २०) असे आत्महत्या

A new marriage affair in Amble | आंबळेत नवविवाहितेची आत्महत्या

आंबळेत नवविवाहितेची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
निमोणे : आंबळे (ता.शिरुर) येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पूजा सचिन कौठाळे (वय २०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
या संदर्भात शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : पूजा यांनी राहत्या घरी दुपारी साडेबाराच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असणाऱ्या दाराची कडी लावून घराच्या छताला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
पूजा या आंबळे येथे शिक्षणासाठी राहत होत्या.तसेच तिने नुकतेच शिरुरच्या रयत संस्थेत प्रवेश घेतला होता. पूजा हिचा विवाह एक वर्षापूर्वी सचिन दगडू कौठाळे (रा. देवदैठण) यांच्याबरोबर झाला होता. मंगळवारी (ता.४) रोजी फिर्यादीच्या चुलतीने खिडकीतून पाहिले असता पूजा हिने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. खासगी दवाखान्यात नेले असता उपचारांपूर्वीच निधन झाले
असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी मयताचे चुलत भाव गौरव सतीश पुंडे यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

Web Title: A new marriage affair in Amble