बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्रराज्यात ढगाळ वातावरण, तापमानात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:05 IST2020-11-29T04:05:39+5:302020-11-29T04:05:39+5:30

निवार चक्रीवादळाने तामिळनाडु, पाँडेचरी परिसरात मोठे नुकसान घडवून आणले होते. त्यानंतर आता पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार ...

New low pressure area in the Bay of Bengal Cloudy weather, increase in temperature in the state | बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्रराज्यात ढगाळ वातावरण, तापमानात वाढ

बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्रराज्यात ढगाळ वातावरण, तापमानात वाढ

निवार चक्रीवादळाने तामिळनाडु, पाँडेचरी परिसरात मोठे नुकसान घडवून आणले होते. त्यानंतर आता पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सध्या ते दक्षिण अंदमान समुद्राजवळ आहे. पुढील ४८ तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ते २ डिसेंबर रोजी दक्षिण तामिळनाडु किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडु, पाँडेचरी परिसरात १ ते ३ डिसेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गेल्या २४ तासात विदर्भातील देऊळगाव राजा, रामटेक, दारव्हा, पौनी, पेंद्रा तसेच मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर परिसरात हलका पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Web Title: New low pressure area in the Bay of Bengal Cloudy weather, increase in temperature in the state