नव्या पिढीमध्ये जोश; पण आत्मविश्वासाचा अभाव
By Admin | Updated: September 17, 2014 02:31 IST2014-09-17T02:31:09+5:302014-09-17T02:31:09+5:30
विद्याथ्र्यानी बहुविध कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होईल. शिक्षणपद्धती बदलली आहे.

नव्या पिढीमध्ये जोश; पण आत्मविश्वासाचा अभाव
च्पिंपरी : विद्याथ्र्यानी बहुविध कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होईल. शिक्षणपद्धती बदलली आहे. आजच्या पिढीमध्ये जोश आहे; पण आत्मविश्वास नाही, अशी खंत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दिघी येथे व्यक्त केली.
च्आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त त्यांनी विद्याथ्र्यांशी संवाद साधला. कलाम म्हणाले, विद्यार्थी नोकरी शोधायला बाहेर पडल्यास आत्मविश्वास उपयुक्त ठरतो. मनात आत्मविश्वास बाळगल्यास यश नक्की मिळेल. आज सर्व साधने उपलब्ध झाल्यामुळे हवी असलेली माहिती क्षणात मिळत आहे. त्याद्वारे विकासाला गती मिळत आहे.
च्विद्याथ्र्यांनी ‘इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी’निर्मितीचा ध्यास घ्यावा. त्यासाठी अतिउत्कृष्ट शिक्षकांची गरज आहे. विद्याथ्र्यांच्या अंगी बहुविध कौशल्ये असावीत. थॉमस एडिसन 999 वेळी अपयशी ठरले. एक हजाराव्या वेळी ते विजेचा शोध लावण्यात यशस्वी झाले.
च्तुम्ही ज्या ठिकाणी राहता, तो परिसर
भ्रष्टाचारमुक्त केल्यास देश आपोआपच भ्रष्टाचारमुक्त होईल. हे बोलणो जितके सोपे, तितके ते काम करणो कठीण आहे; परंतु तुम्ही सैनिकांची मुले असल्यामुळे हे तुम्हाला शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तीन हजार विद्याथ्र्याकडून कलाम यांनी भ्रष्टाचारमुक्तीची शपथ वदवून घेतली.