शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावर नवीन ‘फूड कोर्ट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:20 IST

मागील पाच महिन्यांपासून बंद होते ‘फूड कोर्ट’

ठळक मुद्देविमानतळ टर्मिनल इमारतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये फुड कोर्ट सुरू प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच पर्यायी व्यवस्था केली जाणार

पुणे : मागील पाच महिन्यांपासून पुणे विमानतळ टर्मिनल इमारतीमधील बंद पडलेले ‘फूड कोर्ट’ पुन्हा सुरू करण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) पावले उचलली आहेत. त्यासाठी मंगळवार (दि. ११) पासून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील दीड-दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन फूड कोर्ट सुरू केले जाणार आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्ये फुड कोर्ट सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये मल्टी ब्रँडेड रेस्टॉरन्टचा समावेश होता. त्यामध्ये जेवणाची सुविधाही उपलब्ध होती. त्यामुळे प्रवाशांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळत असल्याने त्याला मागणीही होती. पण काही कारणांमुळे सप्टेंबर २०१९ मध्ये ते बंद करण्यात आले. याबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. फूड कोर्ट लवकर सुरू करण्याची मागणीही त्यांच्याकडून होत आहे. यापार्श्वभूमीवर पुणे विमानतळ संचालक कुलदीप सिंग म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील दीड ते दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. विमानतळावर येणारे प्रवासी कोणत्याही वेळेत येत असतात. त्यामुळे त्यांना विमानतळावर खानपानची चांगली सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. ही सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या आहेत. .........विमानतळावर नळाचे पाणीही मिळतेमाजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी विमानतळावर पाण्याची बाटली ६० रुपयांना मिळत असल्याची तक्रार टिष्ट्वटरद्वारे केली होती. त्यावर विमानतळ प्रशासनाने उत्तर देत दहा रुपयालाही पाण्याची बाटली उपलब्ध असल्याचे सांगितले होते..............याविषयी बोलताना ते म्हणाले, विमानतळावर येणारे प्रवासी वेगवेगळ्या स्तरातील असतात. त्यानुसार पाण्याची बाटली तसेच खाद्यपदार्थांची उपलब्धता असते. प्रिमियम तसेच सर्वसाधारण अशा दोन्ही सुविधा आहेत. तसेच नळाद्वारे स्वच्छ पाणीही उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी पैसे आकारले जात नाहीत. या पाण्याची दर तीन महिन्यांची प्रयोगशाळेत तपासणीही होते. त्यामुळे नळाचे पाणी पिण्यासाठी दर्जेदार असते. तिथे ग्लासही उपलब्ध आहेत. कोणत्याही विमानतळावर पाण्याची वेडिंग मशीन नाही. 

टॅग्स :Puneपुणेpune airportपुणे विमानतळfoodअन्नpassengerप्रवासी