पालिकेच्या विविध समित्यांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. यामध्ये नवीन सभासदांची निवड करण्यात आली आहे. नाव समिती अध्यक्षपदी धनराज घोगरे यांची निवड झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने ''नवा गडी नवा राज'' ऐवजी ''नवा गडी नवे फर्निचर'' असे म्हणण्याची वेळ आली आहे.
समित्यांची कार्यालये नवीन असतानाही पुन्हा नव्या फर्निचरवर खर्च का केला जात आहे, असा सवाल केला जात आहे. नाव समितीचे अध्यक्ष घोगरे यांनी पालिका प्रशासनाकडे नूतनीकरणाची मागणी केली आहे. प्रशासनानेही कोणतीही विचारपूस न करता कामाला सुरुवातही केली आहे. सर्वसामान्य पुणेकरांच्या कराची उधळपट्टी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांकडून सुरु असल्याची टीका होऊ लागली आहे.
कोरोनाकाळात पालिकेला आर्थिक फटका बसला आहे. पालिकेचे उत्पन्न घडले आहे. त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. विकासकामांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. परंतु, पदाधिकाऱ्यांच्या हट्टापायी आवश्यकता नसलेल्या नूतनीकरणासारख्या गोष्टींवर खर्च केला जात आहे.
-------
अधिकाऱ्यांनी विरोध करताच केले जाते ''टार्गेट''
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नूतनीकरण्यास विरोध केला तर त्यांना धारेवर धरण्यात येत असल्याचे चित्र आहे. काम करत नाही म्हणून अधिकाऱ्यांनाच जाब विचारला जातो. त्यामुळे अधिकारीही निमूटपणे काही न बोलता ही कामे करीत आहेत.