‘माळेगाव’ला नव्या चेहऱ्यांना संधी
By Admin | Updated: October 30, 2015 00:03 IST2015-10-30T00:03:50+5:302015-10-30T00:03:50+5:30
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काही जुन्या मंडळींना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

‘माळेगाव’ला नव्या चेहऱ्यांना संधी
माळेगाव : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात काही जुन्या मंडळींना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. मतदारांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. बहुरंगी लढतीमुळे निवडणूक निकालदेखील संमिश्र लागला आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी रस्सीखेच होणार आहे.
जय तुळजाभवानी ग्रामविकास पॅनल, माळेगाव विकास पॅनल, श्रीनाथ ग्रामविकास पॅनल, नागेश्वर ग्रामविकास पॅनल, जनसेवा ग्रामविकास पॅनल, जय हनुमान ग्रामविकास पॅनल असे ६ पॅनलच्या माध्यमातून उमेदवारांनी निवडणूक लढविली. एकूण १७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये ६१ उमेदवार रिंगणात उतरून आपले भाग्य अजमावीत होते.
बारामतीच्या राजकारणाचे सत्ता केंद्र बनत असलेल्या माळेगावचा गाडा हाकण्याचा मान आपल्याला मिळावा, माळेगावची सत्ता आपल्या हाती यावी, त्यातच जवळपास एक दशकानंतर सरपंचपद हे खुल्या पुरुषवर्गासाठी राखीव असल्याने गावातील बड्या नेत्यांनी स्वत: या निवडणुकीत लक्ष घातले होते. त्यामुळे निवडणूक हळूहळू प्रतिष्ठेची बनत गेली. काही उमेदवार दुसऱ्या, तर काही तिसऱ्यांदा आपले भाग्य अजमावीत होते. त्यात काहींना यशही प्राप्त झाले .
बोरीऐंदीत ‘जनसेवा पॅनेल’चा विजय
यवत : बोरीऐंदी (ता.दौंड) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या लढतीत बोरमलनाथ जनसेवा पॅनलने विजय मिळविला आहे.
एकूण ११ जागांसाठी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, यात ६ जागांवर बोरमलनाथ जनसेवा पॅनलचे उमेदवार विजयी झाले, तर ५ जागांवर श्रीनाथ लोकसेवा पॅनलचे उमेदवार विजयी झाले.
वॉर्ड क्र. १ मध्ये बोरमलनाथ जनसेवा पॅनलचे प्रमिला राजेंद्र तावरे , सविता मंगेश भोसेकर व प्राची अमोल शेलार विजयी झाले, तर श्रीनाथ लोकसेवा पॅनलचे नंदा रामलाल भोसेकर, कृष्णाबाई जीवन पवार व संगीता राजेंद्र शेलार पराभूत झाले.
वॉर्ड क्र.२ मध्ये बोरमलनाथ जनसेवा पॅनलच्या पूनम रवींद्र दौडकर व श्रीनाथ लोकसेवा पॅनलचे सचिन तुकाराम गायकवाड, कमल भगवान थोरात विजयी झाले, तर श्रीनाथ लोकसेवा पॅनलच्या नंदा श्यामराव दौंडकर व बोरमलनाथ जनसेवा पॅनलचे रघुनाथ बंडू शेंडकर, रोशनी दिलीप गायकवाड यांचा पराभव झाला.
वॉर्ड क्र.३ मध्ये श्रीनाथ लोकसेवा पॅनलच्या जयश्री महादेव यादव ,अजय गणपत शेलार व महेंद्र राजाराम गायकवाड विजयी झाले, तर बोरमलनाथ जनसेवा पॅनलच्या संध्या बबन दरेकर, रवींद्र भगवान, झुरंगे व कैलास सखाराम शेलार पराभूत झाले. वॉर्ड क्र.४ मध्ये बोरमलनाथ जनसेवा पॅनलच्या नंदा रामदास गायकवाड व रामदास माणिक दरेकर विजयी झाले, तर श्रीनाथ लोकसेवा पॅनलच्या कमल बाळासो ताम्हाणे व सुखदेव पांडुरंग दरेकर पराभूत झाले. अत्यंत अटीतटीने झालेल्या सदर निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. बोरमलनाथ जनसेवा पॅनल वर आमदार राहुल कुल गटाचे वर्चस्व असून त्याचे नेतृत्व माजी उपसरपंच राजेंद्र तावरे, मंगेश भोसेकर, महादेव कुदळे, किसन गायकवाड, प्रताप तावरे, बबन शेंडकर, मोहन म्हेत्रे व भाऊसाहेब दरेकर यांनी केले, तर श्रीनाथ लोकसेवा पॅनलचे नेतृत्व दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव यादव, मुरलीधर भोसेकर, बाळासाहेब गायकवाड, सुरेश दरेकर यांनी केले.
विजयी उमेदवार : नावे व मिळालेली वैध मते
वॉर्ड १- रवींद्र वाघमोडे (१६३७), वर्षा पडर (१९३३), राजेंद्र चव्हाण (१४९९).वॉर्ड २ -मोहिनी बनसोडे (९०१), अशोक सस्ते (८४०). वॉर्ड ३ -मंगल लोणकर (१३६१), विजयमाला पैठणकर (११६५), जयदीप तावरे (११७७). वॉर्ड ४ - गंगाधर भोसले (९१६), लियाकत तांबोळी (१०३२) रेखा मोरे (८८७). वॉर्ड ५-शीतल खरात (९७६), वृषाली तावरे (८८९), अविनाश तावरे (११५५).वॉर्ड ६ -प्रियदर्शनी वाघमोडे (५८९), पल्लवी तावरे (७३६), जयदीप तावरे (९४६)