प्रवचनाच्या माध्यमातून मिळते नवी दिशा
By Admin | Updated: November 30, 2015 01:43 IST2015-11-30T01:43:31+5:302015-11-30T01:43:31+5:30
चातुर्मासामध्ये संतांच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळते व सत्कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते.

प्रवचनाच्या माध्यमातून मिळते नवी दिशा
पिंपरी : चातुर्मासामध्ये संतांच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळते व सत्कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. आम्ही जातो पुढच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, असे मत जैन साधू प्रशांत ऋषीमहाराज यांनी कासारवाडी येथे व्यक्त केले.
चातुर्मासानिमित्त कासारवाडी जैनस्थानकामध्ये प्रवचन भास्कर, समतासाधक प्रशांतऋषी महाराज आणि करुणामूर्ती परमपूज्य अचलऋषी महाराज यांचा चातुर्मास अनेक धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून संपन्न झाला. चातुर्मास समाप्तीनिमित्त बिदाई समारंभ संघाच्या वतीने घेण्यात आला. या वेळी प्र्रशांतऋषीमहाराज म्हणाले, ‘‘कासारवाडी येथे चातुर्मासामध्ये कासारवाडी संघाच्या सर्व भाविकांनी अत्यंत उत्साहाने सर्व कार्यक्रमांत सहभागी होऊन हा चातुर्मास आध्यात्मिक व सामाजिक दृष्टीने यशस्वी केला. संघ संख्येने लहान असला, तरी येथील भाविकांमध्ये आपल्या संतांबद्दल आणि धर्माबद्दल नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे या चातुमार्सामध्ये तप, जप, प्रवचन व अनेक धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर झाले. चातुर्मासामध्ये संतांच्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाला एक नवी दिशा मिळते व सत्कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. ‘‘लेकर संघ की सेवा अपार, जाने का अब हम करते विचार, कई गाव देखे कई शहर देखे, लोगो के दिल पत्थर जैसे होते है, लेकिन कासारवाडी में देखा, पत्थर को भी दिल होता है.’’
या वेळी अनेकांनी संतांबद्दल व चातुर्मासाबद्दल मनोगत व्यक्त केले. वसंतलाल बोरा, विलास पगारिया, किशोर मुनोत, जवाहरलाल भंडारी, रमणलाल शिंगवी, शांतिलाल फुलपगर, श्रेयस पगारिया, तसेच इंदिरा बोरा, आशा कर्नावट, सुशीला भंडारी, पुष्पा कर्नावट, सुमन फुलपगर, श्रुती पगारिया, भाग्यश्री भंडारी, कीर्ती कर्नावट, नितल फुलपगर, वंदना कुवाड, प्रा. अशोक पगारिया यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. पगारिया यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)