पब्लिक रिलेशनशिपला नवे आयाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:15+5:302021-09-02T04:24:15+5:30
पीआर (पब्लिक रिलेशनशिप) मध्ये आज बरेच लोक आपले भविष्य आजमावत असतात. परंतु आपल्या कंटेंटच्या आणि एकूणच सर्व कामाच्या जोरावर ...

पब्लिक रिलेशनशिपला नवे आयाम
पीआर (पब्लिक रिलेशनशिप) मध्ये आज बरेच लोक आपले भविष्य आजमावत असतात. परंतु आपल्या कंटेंटच्या आणि एकूणच सर्व कामाच्या जोरावर फार थोडेच लोक हे यशाचे शिखर गाठत असतात. त्यापैकीच एक म्हणजे पुण्याचे देवेंद्र संपत माळी.
सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले देवेंद्र माळी हे नाव आता पीआर क्षेत्रात सर्वांना परिचित असे नाव आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलं हे साधारणतः इंजिनिअर किंवा डॉक्टर होण्याची स्वप्न पाहत असतात. कुटुंबीयांकडूनही तेच रुजवले जाते. देवेंद्र माळी यांच्या कुटुंबीयांनीही तेच स्वप्न बघितले होते. परंतु त्यांची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वित्त व्यवस्थापनापासून सर्व काही व्यवस्थापित करण्यापर्यंत जो संघर्ष आहे तो त्यांनी मोठ्या सचोटीने हाताळला. त्यादृष्टीने पावले उचलली.
बीएमसीसी कॉलेजमध्ये असताना त्यांनी कॉलेज इव्हेंटच्या पीआरचे काम केले आणि तेथूनच खऱ्या अर्थाने त्यांनी झेप घेण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे मुलगा काहीतरी करतोय हे पाहून कुटुंबीयांनी देखील त्यांना पाठिंबा दिला. महाविद्यालयीन जीवनात त्यांना उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पुरस्कार मिळाला होता. मॉडर्न कॉलेजमधून त्यांनी एमबीएची पदवी धारण केली आहे. त्यांची नुकतीच माजी विद्यार्थी समितीवर त्यांची अध्यक्ष नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा सन्मान त्यांच्यासाठी एक पुरस्कारापैकीच असल्याचे ते सांगतात. या कामात जम बसविण्यासाठी त्यांनी एक-दोन ठिकाणी इंटर्नशीप केली, जॉबदेखील केला आणि पीआर क्षेत्रातील सर्व बारकावे समजून घेत स्वतःची Hazel Outlook Public Relations Firm सुरू केली.
या क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना विविध मानसन्मानदेखील प्राप्त झाले आहेत. ते सुरुवातीला फॅशन क्षेत्रामध्ये जास्त काम करत होते. 'लॅक्मे फॅशन वीक'चे सलग सहा सिझन त्यांनी आयोजित केले. या कामगिरीसाठी त्यांचा सन्मानदेखील करण्यात आलेला आहे.
पब्लिक रिलेशनमध्ये सहसा फक्त 'न्यूज मॅनेजमेंट' या विषयाला अनुसरून काम होते. मात्र यामध्ये नावीन्यता आणण्यासाठी ते परसेप्शन बिल्डिंग किंवा इमेज मॅनेजमेंट हा प्रकार त्यामध्ये आणण्यासाठी काम करत आहेत. पीआरकडे फक्त पब्लिक रिलेशन्स म्हणून न बघता त्यास परसेप्शन मॅनेजमेंटकडे घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी अशीच यशाची शिखरे सर करून आपल्या नावाचा ठसा अधिक ठळक करावा, हीच इच्छा!