शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

लोणीकंद येथील तलावात नव दांपत्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 17:53 IST

आत्महत्या केलेले कुटुंब हे सुशिक्षित दांपत्य होते.

लोणीकंद : लोणीकंद पोलीस स्टेशनच्या पाठीमागील तलावात नवदांपत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी ( दि. १८) उघडकीस आली. मंगेश म्हसू नागरे (वय २६) व प्रियांका मंगेश नागरे (वय २० रा. सोहम रेसीडेन्सी सोसायटी, वाघोली मुळ रा. अस्तगाव, नाशिक) यांचे मृतदेह आढळले आहेत. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गणेश म्हसू नांगरे (रा. सोहम रेसीडेन्सी सोसायटी, वाघोली )यांनी फिर्याद  दिली असून त्यांनी लोणीकंद पोलिसात नवरा बायको बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसापूर्वी दिली होती.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद जवळील सुरभी हॉटेल समोरील तलावात सकाळीच अनोळखी तरुण तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. लोणीकंद पोलिसांना माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. तरुण तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. भाऊ गणेशला बोलवल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली असून नंतर ससूनकडे रवाना करण्यात आले आहे. हे दोघे नवरा बायको असून दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. मंगेशचे इंजिनिअरींग तर प्रियांका चे १३ वी पर्यंत शिक्षण असून त्याचे इंग्रजी हिंदी मराठीवर प्रभुत्व असून सुशिक्षित दांपत्य होते. कुटुंबातील कुरबुरी असल्याने ते कोणाला काहीएक न सांगता १५ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता घरातून निघुन गेले होते. लोणीकंद पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनखाली याबाबत पुढील तपास  पोलिस हवालदार मोहन अवघडे व सहकारी  करत आहेत.

 

टॅग्स :Loni Kandलोणी कंदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस