नेट परीक्षा 28 डिसेंबरला
By Admin | Updated: October 4, 2014 02:22 IST2014-10-04T02:22:03+5:302014-10-04T02:22:03+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) 28 डिसेंबरला पहिली नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (नेट) घेतली जाणार आहे.

नेट परीक्षा 28 डिसेंबरला
>पुणो : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) 28 डिसेंबरला पहिली नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट (नेट) घेतली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) काही महिन्यांपूर्वी नेट परीक्षेची जबाबदारी सीबीएसईकडे सोपविण्याचा निर्णय घेतला होता.
सीबीएसईकडून डिसेंबर 2क्14 मध्ये पहिलीच पदव्युत्तर पदवीनंतरची परीक्षा आयोजित केली जाणार आहे. यूजीसीतर्फे प्राध्यापकपदाच्या पात्रतेसाठी घेतल्या जाणा:या नेट परीक्षेला देशभरातून लाखो विद्यार्थी प्रविष्ठ होतात. परंतु, यूजीसीने आपल्या कामाचा व्याप कमी करण्यासाठी नेट परीक्षेची जबाबदारी सीबीएसईकडे सोपवली. यूजीसीप्रमाणोच सीबीएसईकडून नेट परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या सेट परीक्षा केंद्रांचे सहकार्य घेतले जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे गोवा आणि महाराष्ट्रातील सेट व नेट परीक्षांचे आयोजन केले जाते. दोन दिवसांपूर्वी विद्यापीठाला परिक्षेसंदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)