नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कोणी नाही!

By Admin | Updated: January 19, 2016 01:38 IST2016-01-19T01:38:48+5:302016-01-19T01:38:48+5:30

अग्गो बाई... ढग्गो बाई..., नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच..., दूर देशी गेला बाबा... गेली कामावर आई... नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कोणी नाही...

Neju Dully has no one at home in the eye! | नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कोणी नाही!

नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कोणी नाही!

प्राची मानकर, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)
अग्गो बाई... ढग्गो बाई..., नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच..., दूर देशी गेला बाबा... गेली कामावर आई... नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कोणी नाही... या गीतांमधून आई-वडील मुलांना वेळ देत नाही. त्यामुळे मुलांच्या आणि पालकांच्या मनाला चटका लावणारे गीताने पालकांचे डोळे पाणावले.
तसेच लहान मुलांनी आई-वडिलांसाठी गायलेली अंगाई, करून करून काळजी माझी... करून करून लाड... दमलात तुम्ही आई बाबा...झोपा जरा गाढ, अशा एकसो एक बालकलाकारांनी गायलेल्या गाण्यांना लहान मुलांनी आणि पालकांनी भरभरून टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. काही गाण्यांना वन्स मोअर म्हणत पालकांनीही आपले बालपण अनुभवले.
८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुलांचा आनंदोत्सव, बालआनंद मेळावा : मामाच्या गावाला जाऊ या कार्यक्रमाचे आयोजन मंगेश पाडगावकर सभागृहात केले होते. या कार्यक्रमाची संहिता व दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले. नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले. यामध्ये डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे, बालकलाकार शुभंकर कुलकर्णी, चैतन्य देवढे, निधी घारे, प्रांजली बर्वे यांनी अनेक गाणी सादर केली. या कार्यक्रमाची रंगत वाढवली. बालकलाकार शुभंकर अत्रे, सुहानी धडफळे आणि त्यांना मिमिक्रीच्या स्वरूपात साथ दिली. अभिनेत्री मेघना एरंडे यांनी त्यांच्या विनोदात्मक निवेदनाने बालचमूची हसून हसून पुरेवाट झाली. या वेळी बाबा भांड, कवयित्री डॉ. संगीता बर्वे, डॉ. विजया वाड, डॉ. कांचन सोनटक्के, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सुनील महाजन, मधुकर भावे उपस्थित होते.
मंगेश पाडगावकर, विं. दा. करंदीकर लिखित गीते बालकलाकारांनी सादर केली. मुंगी बाय.. मुंगी बाय.. पिटपिट पिटपिट.., एका माकडाने काढलंय दुकान..., लख लख चंदेरी-सोनेरी न्यारी दुनिया... हे नृत्य बालकलाकारांनी सादर केले आणि बालप्रेक्षकांची पावलेही या गाण्यांवर थिरकली गेली. तसेच शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा... पोपट होता सभापती मधोमधी उभा या बालकलाकारांच्या मनोरंजनात्मक नृत्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Web Title: Neju Dully has no one at home in the eye!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.