शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ना मुक्ता टिळक ना हेमंत रासने ; कसब्यासाठी बापटांची तिसऱ्यालाचं पसंती  ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 16:36 IST

मी कायम कार्यकर्त्यांना महत्व दिले आहे. मागील तीस वर्षात हमालीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीपासून अनेकांना नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे कसब्यातूनही कार्यकर्त्याच्या नावालाच पसंती असेल असे विधान खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात केले आहे. 

पुणे : मी कायम कार्यकर्त्यांना महत्व दिले आहे. मागील तीस वर्षात हमालीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीपासून अनेकांना नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. त्यामुळे कसब्यातूनही कार्यकर्त्याच्या नावालाच पसंती असेल असे विधान खासदार गिरीश बापट यांनी पुण्यात केले आहे. 

शहरातील एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीविषयी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले. कसबा विधानसभा मतदारसंघातून बापट यांनी पाच वेळा आमदार म्ह्णून प्रतिनीधित्व केले आहे. बापट लोकसभेवर निवडून गेल्यामुळे त्या मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांच्यासह नगरसेवक हेमंत रासने यांच्यासह इच्छुकांची मोठी संख्या आहे. अशावेळी बापट यांचा शब्द महत्वाचा ठरणार आहे. अखेर त्यांनी याविषयावर मत व्यक्त केले असून त्यांनी कोणत्याही विद्यामान पदाधिकाऱ्याचे किंवा नगरसेवकाचे नाव न घेता कार्यकर्त्याला उमेदवारी देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे इच्छुकांच्या पोटात गोळा येणार असून काहींच्या आशाही पल्लवित होऊ शकतात. 

 याबाबत ते म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना न्याय देणारा माणूस आहे. सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात जे नाव असेल तेच सांगितले जाईल. मी म्हणेल ते खरं म्हणण्यापेक्षा खरं तेच मी म्हणेन असा प्रयत्न असेन. तिकीट देण्याचा निर्णय प्रदेश कार्यकारिणी घेणार असून विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाईल की नाही याबाबतही तेच निर्णय घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :girish bapatगिरीष बापटBJPभाजपाMukta Tilakमुक्ता टिळकkasba-peth-acकस्बा पेठ